धार्मिक स्वातंत्र्यावरील अहवालावरून भारताने अमेरिकेला सुनावले

धार्मिक स्वातंत्र्यावरील अहवालावरून भारताने अमेरिकेला सुनावले

India and United States flags together realtions textile cloth fabric texture

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा २०२१चा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अहवाल परराष्ट्रमंत्री अ‍ॅण्टनी ब्लिंकन यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशित झाला. भारतात अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यावरून भारताने तीव्र प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अहवालात भारतात अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवार, ३ जून रोजी यावर आपलं मत व्यक्त केले. “अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अर्धवट माहितीच्या आधारे केलेले भाष्य” अशा शब्दांत मत मांडले असून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही मतपेढीचे राजकारण करणे दुर्दैवी आहे,” अशी टीकाही भारताने केली आहे.

“आमच्या देशातील नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर भाष्य करण्याचा अन्य देशांना कोणताही अधिकार नाही,” अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या अहवालावरून टीका केली आहे.

हे ही वाचा:

या व्यवस्थेमुळे पाकिस्तान ‘ऑनर किलिंग’ मध्ये अव्वल

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रिंकूवर झाला होता गोळीबार…

वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर्सनी घेतली टी-शर्टवर पंतप्रधानांची स्वाक्षरी

जम्मू काश्मीरमध्ये दोन हल्ल्यांत मजुरासह बँक मॅनेजरचा मृत्यू

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अिरदम बागची म्हणाले की, “अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातर्फे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतासंदर्भात अनावश्यक आणि अर्धवट माहितीच्या आधारे चुकीची टिप्पणी केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांतही एका विशिष्ट समूहाला खूश ठेवण्यासाठी मतांचे दुर्दैवी राजकारण केले जाते. पूर्व दृष्टिकोन आणि विशिष्ट हेतूंनी प्रेरित माहितीवर आधारित विश्लेषण करणे टाळावे,” असे आवाहनही बागची यांनी केले आहे.

Exit mobile version