मॉरिशसचे पोलीस वापरणार भारतीय हेलिकॉप्टर

मॉरिशसचे पोलीस वापरणार भारतीय हेलिकॉप्टर

मित्र देशांना संरक्षण उत्पादन निर्यात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून भारत मॉरिशिसला हेलीकॉप्टर निर्यात करणार आहे. प्रगत हलकी हेलिकॉप्टर (एएलएच एमके- ३) खरेदीबाबत मॉरिशिसने बुधवारी ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’शी (एचएएल) एक करार केला आहे. मॉरिशिस पोलीस दल या हेलीकॉप्टरचा वापर करणार आहेत.

भारत आणि मॉरिशिसने या कराराद्वारे हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड आणि मॉरिशिस सरकारने तीन दशकांहून अधिक काळापासूनचे आपले व्यावसायिक संबंध अधिक दृढ केले’ असे ‘एचएएल’ने म्हटले आहे. बुधवारी ज्या हेलीकॉप्टर विक्रीचा करार झाला ते एएलएच एमके III (ALH Mk III) हे ५.५ टन श्रेणीतील एक उत्तम हेलिकॉप्टर आहे. भारत आणि परदेशात नैसर्गिक आपत्तींच्या वेळी असंख्य मोहिमांसह विविध उपयुक्त भूमिकांमध्ये या हेलीकॉप्टरने आपली क्षमता सिद्ध केली आहे.

हे ही वाचा:

‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’

‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर टाळे’

भारतीय संघाच्या कर्णधार, उपकर्णधारासह चार खेळाडूंना कोरोनाची लागण

कुरापती चीनने भारतीय हद्दीतून १७ वर्षीय मुलाचे केले अपहरण

‘एचएएल’ने यापूर्वीही मॉरिशिसला प्रगत हलकी हेलिकॉप्टर आणि डॉर्निअर २२८ विमाने विकली आहेत. या विमानांचा वापर मॉरिशिस सरकारकडून केला जात आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या हेलिकॉप्टर विभागाचे महाव्यवस्थापक बी के त्रिपाठी आणि मॉरिशस सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचे गृह विभागाचे सचिव ओ के दाबिदीन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Exit mobile version