भारताने श्रीलंकेसोबत एअर बबल करार केला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत पात्र प्रवासी प्रवास करू शकतात. नागरी विमान मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार भारताने सार्क परिसरातल्या सहा देशांशी एअर बबल करार केला आहे. यासोबतच एकूण २८ देशांशी भारताचा हा करार झाला आहे.
हे ही वाचा:
लॉकडाउनचा पेच, संभ्रमाचा चक्रव्यूह
काशी विश्वेश्वराच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्यांना धमकीचे फोन
पश्चिम बंगालमधून स्फोटक साहित्य जप्त
‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’
एअर बबल करार हा करार करणाऱ्या देशांच्या नागरीकांना त्या देशांमध्ये प्रवासाची मुभा देतो. हा करार तात्पुरत्या स्वरूपाचा केला जातो. सध्याच्या कोविड-१९ महामारीच्या काळात सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांना बंदी आहे. अशा परिस्थितीत, प्रवाशांना त्या दोन देशांमध्ये प्रवास करण्याची मुभा या कराराद्वारे मिळते.
सर्व विमानकंपन्याना वेबसाईटद्वारे अथवा विक्रेत्यामार्फत त्या देशांत ने- आण करणारी तिकीटे विकण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असले तरीही प्रवाशांना त्या देशात जाताना, ते देश प्रवाशांना येण्यास परवानगी देत आहेत ना याची निश्चिती करणे आवश्यक आहे.
भारताचे ज्या २८ देशांशी एअर बबल करार झाले आहेत त्या देशांची नावे
अफगाणिस्तान, बहारिन, बांग्लादेश, भूतान, कॅनडा, इथिओपिआ, फ्रान्स, जर्मनी, इराक, जपान, केनिया, कुवेत, मालदिव्ज, नेपाल, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, कतार, रशिया, रवांडा, सेशेल्स, टांझानिया, युक्रेन, युनायटेड अरब एमिरेट्स, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, उझबेकिस्तान.