भारत – मालदीव दरम्यान पन्नास दशलक्ष डॉलरचा सैन्य करार

भारत – मालदीव दरम्यान पन्नास दशलक्ष डॉलरचा सैन्य करार

भारताने मालदीवच्या सुरक्षेसाठी मालदीवशी ५० दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे. या करारांतर्गत शस्त्रास्त्र खरेदीसाठी भारताने मालदीवला कर्ज देण्याचा करार केला आहे. संरक्षण प्रकल्पांसाठी ५०दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचा करार मालदीवचे अर्थ मंत्रालय आणि भारतीय निर्यात आयात बँक यांच्यात झाला आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मालदीवचे संरक्षणमंत्री मारिया दीदी, अर्थमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फय्याज इस्माईल आणि राष्ट्रीय नियोजन, गृहनिर्माण व पायाभूत सुविधा मंत्री मोहम्मद असलम यांच्याशी चर्चा केल्यानंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

भारतीय परराष्ट्रमंत्री हे दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी या करारासंदर्भात मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांशी बैठक घेतली. “आमच्या संरक्षण सहकार्याचे उपयुक्त आदानप्रदान करण्यात आले. भारत हा मालदीवसाठी नेहमीच एक विश्वासू सुरक्षा भागीदार असेल.” असे ट्विट जयशंकर यांनी केले.

हे ही वाचा:

मोदींच्या दणक्यामुळे चीनचा काढता पाय

“प्राचीन काळापासून भारत आणि मालदीव यांच्यात असलेल्या नात्यातील संरक्षण सहकार्य हा एक महत्त्वपूर्ण घटक राहिलेला आहे. सिफावारू येथील कोस्ट गार्ड हार्बर आणि डॉकयार्ड हा या संबंधांमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.” असे मालदीवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी म्हणाल्या.

Exit mobile version