काश्मीरवर ह्युंदाई पाकिस्तानच्या वादग्रस्त ट्विटनंतर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. दक्षिण कोरियाच्या राजदूताला तसेच सेऊलमध्ये बोलावल्याबद्दल भारताने आक्षेप घेतला आहे. ह्युंदाई कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्वावरही भारताने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी भारताच्या कठोर भूमिकेनंतर दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन करून घडामोडींवर खेद व्यक्त केला आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, “दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग इओ-यंग यांनी आज फोन केला. यादरम्यान द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांसह ह्युंदाई मुद्द्यावरही चर्चा केली आहे.”
Received a call from ROK FM Chung Eui-yong today. Discussed bilateral and multilateral issues as also the Hyundai matter.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 8, 2022
ह्युंदाईच्या पाकिस्तानी डीलरच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये ‘काश्मीर एकता दिवस’चे समर्थन करण्यात आले होते. या पोस्टनंतर ट्विटरवर ‘बॉयकॉट ह्युंदाई’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि अनेकांनी ह्युंदाईची उत्पादने न घेण्याचे आवाहन केले. यानंतर, ह्युंदाई मोटर्स इंडियाने सोशल मीडियावर एक संदेश जारी करून स्पष्ट केले की ते भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहे.
हे ही वाचा:
‘महाराष्ट्र बंद’चा निर्णय महाविकासआघाडीला पडणार महागात?
कर्नाटकात जय श्री राम विरुद्ध अल्ला हू अकबर वाद पेटला
पाच मिनिटांत विकली गेली भारत पाक सामन्याची तिकीटे
तसेच, कंपनीने आज माफीनामा जारी केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ह्युंदाई कंपनीने स्पष्ट केले आहे की ती राजकीय आणि धार्मिक मुद्द्यांवर भाष्य करणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की दक्षिण कोरियाच्या राजदूताला ह्युंदाईच्या पाकिस्तान युनिटने शेअर केलेल्या अस्वीकार्य सोशल मीडिया पोस्टबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.