28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरदेश दुनियाअनुपम खेर म्हणतात, काश्मीरातील हिंदुंच्या हत्येने ३१ वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली!

अनुपम खेर म्हणतात, काश्मीरातील हिंदुंच्या हत्येने ३१ वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली!

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामान्य लोकांना लक्ष्य केले जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माखनलाल बिंदरू यांच्या हत्येवर ते आता उघडपणे बोलले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी काश्मिरी पंडितांच्या निर्दयी हत्येचा उल्लेख केला आहे.

अनुपम खेर यांनी काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंवरील अत्याचारावर देशवासियांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अभिनेत्याने पोस्टमध्ये लिहिले, “माखनलाल बिंदरू आणि इतर निरपराध भारतीयांची काश्मिरात निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे ३१ वर्षां पूर्वीची आठवण पुन्हा एकदा झाली आहे. १९ जानेवारी १९९० या दिवशी हजारो काश्मिरी पंडीत मारले गेले होते. खूप महिलांवर एका रात्रीत बलात्कार करण्यात आला होता. तसेच काश्मिरी हिंदूना काश्मीर सोडण्यापासून प्रवृत्त करण्यात आले होते.

अधिक बोलताना ते म्हणाले, “माखनलाल बिंदरूच्या हत्येने ते आतून हादरले आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज सुमारे तीस वर्षांपूर्वी जे घडले ते पुन्हा पुन्हा केले जात आहे. ते पुढे म्हणाले की, “अशा भीषण हत्यांमागील त्यांचा हेतू ‘अल्पसंख्यांकांना’ काश्मीरमधून कोणत्याही प्रकारे हाकलणे हेच आहे.” काश्मिरी पंडितांच्या भीतीची आठवण करून देताना खेर म्हणाले, “असे समजू नका की समस्या फक्त काश्मीर किंवा लडाख किंवा जम्मूमध्ये आहे किंवा ही समस्या फक्त काश्मिरींची आहे. सुरक्षा दले उपस्थित आहेत आणि कार्यरत आहेत, पण भारतीय म्हणून आपण गप्प राहून चालणार नाही. बिंदरूंच्या कुटुंबाला आता पाठिंबा देणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

फडणवीस म्हणतात, ‘मी मुख्यमंत्री नाही हे मला जनतेने कधी जाणवूच दिले नाही’

वाढदिवसानिमित्त उद्योगांना वीजदरात सबसिडी देण्याचा ऊर्जा मंत्र्यांचा उद्योग

शिवसेनेकडून ‘बेस्ट’ला खड्ड्यात घालण्याचा पराक्रम

तोंड झाकणाऱ्या मास्कपासून बनताहेत पायपुसणी; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

 

२ ऑक्टोबर रोजी माखनलाल बिंदरू यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. अलीकडेच, दोन शिक्षकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. याशिवाय बिहारमधील भागलपूर येथील रहिवाशालाही काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सोमवारी लष्कराच्या तुकडीवरही हल्ला केला होता, ज्यात पाच जवान शहीद झाले होते. प्रत्युत्तरादाखल लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा