भारताचे युक्रेनमधील दूतावास तात्पुरते हलवले पोलंडमध्ये

भारताचे युक्रेनमधील दूतावास तात्पुरते हलवले पोलंडमध्ये

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबायचे नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस हा संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे. या युद्धाचा परिणाम साऱ्या जगावर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसत आहे. पण या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेत आपले युक्रेनमधील दूतावास पोलंडमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, १३ मार्च रोजी हा निर्णय घेण्यात आला असून तात्पुरते हे दूतावास पोलंडमधून कार्यरत असणार आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली असून भारत सरकारचे अधिकृत प्रसिद्धी पत्रक शेअर केले आहे.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे

‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर

देवेंद्र फडणवीसांची चौकशी हे सुडाचे राजकारणच

‘आजचे प्रश्न हे गोपनीय कायद्याचे उल्लंघन मीच केल्यासारखे होते’

या प्रसिद्धी पत्रकात भारत सरकार असे म्हणते, “युक्रेनमध्ये झपाट्याने ढासळत चाललेली सुरक्षा परिस्थिती, ज्यामध्ये देशाच्या पश्चिमेकडील भागांमध्ये हल्ले होत आहेत, या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय दूतावास तात्पुरते पोलंडमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात घडणाऱ्या घडामोडींनंतर परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन केले जाईल.”

दरम्यान यापूर्वी भारत सरकारने या दूतावासाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची मदत केली आहे. भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ च्या अंतर्गत हजारो भारतीयांना सुखरूप मायदेशात परत आणले आहे.

Exit mobile version