भारताकडून विविध देशांना कोविड काळात मदत पाठवण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले मदतकार्य भारताकडून अजूनही थांबवण्यात आलेले नाही. त्याचाच एक भाग म्हणून इंडोनेशिया या देशाला भारताकडून मदत पाठवण्यात आली आहे. भारताची आयएनएस ऐरावत ही युद्धनौका ही मदत घेऊन शनिवार, २४ जुलै रोजी जकार्ता येथे दाखल झाली.
शनिवारी सकाळी भारताची आयएनएस ऐरावत हे युद्धनौका कोविड काळातील मदतीचे साहित्य घेऊन जकार्ता येथे पोहोचली. कोविड महामारीचा सामना करण्यासाठी हे जहाज इंडोनेशियात १०० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सीजन आणि ३०० ऑक्सिजन कॉनसँट्रेटर्स घेऊन गेले आहे. भारताच्या या मदतीमुळे भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांमधले संबंध अधिक मजबूत होणार आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील जेईईच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा
भारताने ‘ही’ मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास
मीराबाई चानूने रौप्य पदक उचलले
भारत आणि इंडोनेशिया यांच्यात दृढ सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध आहे. सुरक्षित भारत-प्रशांत महासागर परीसरासाठी हे दोन्ही देश संयुक्त मोहिमा राबवत असतात. तसंच द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करणे आणि सामाईक गस्तीसाठी देखील दोन्ही देशांच्या नौदलांच्या संयुक्त मोहिमा सुरु असतात.
आज भारताने अशाच प्रकारे शेजारील मित्र राष्ट्र असणाऱ्या बांग्लादेशलाही मदत पाठवली आहे. भारताने पहिल्यांदाच ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून द्रवरूपी ऑक्सिजन पाठवण्यात आला आहे. २०० मेट्रिक टन इतका द्रवरूपी ऑक्सिजन बांग्लादेशला पाठवण्यात आला आहे.