भारताची व्हॅक्सिन मैत्री पुन्हा सुरू; अफगाणिस्तानला दिले पाच लाख लसीचे डोस

भारताची व्हॅक्सिन मैत्री पुन्हा सुरू; अफगाणिस्तानला दिले पाच लाख लसीचे डोस

भारताने मानवतेच्या दृष्टीने अफगाणिस्तानला कोरोना प्रतिबंधित लसीचे पाच लाख डोस दिले आहेत. कोव्हॅक्सिन या लसीचे पाच लाख डोस भारताने अफगाणिस्तानला दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील काबूल येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला या लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुन्दजई यांनी लस पुरवठा केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत.

ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाल्यापासून तिथल्या सामान्य लोकांचे जीवन अत्यंत खडतर बनले आहे. महागाई, गरिबी, बेरोजगारी आदी समस्यांनी अफगाणिस्तानमध्ये डोके वर काढले असून आरोग्य सेवेचाही फज्जा उडाला आहे. त्याचवेळी जगभरात धुमाकूळ घालणारा ओमिक्रोन व्हेरियंटपासून बचाव करणे हे तेथील नागरिकांपुढे आणि शासनकर्त्यांसमोरील एक मोठे आव्हान असणार आहे. याच वेळी भारताने चीन आणि पाकिस्तानच्या आधी अफगाणिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे.

काबूलमधील इंदिरा गांधी रुग्णालयात हे पाच लाख डोस पाठवून देण्यात आले आहेत. १.६ आरोग्य सामग्री भारतातून रवाना करण्यात आली असून आगामी काळात आणखी पाच लाख लसीचे डोस देण्यात येणार आहेत. ही मदत जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

कोरोनाचा विस्फोट; राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजारच्या जवळपास

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईतून ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

नवाब मालिकांचा जावई समीर खानच्या अडचणीत वाढ

‘२०१७ चे वचन पूर्ण करायला २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले’

भारताने यापूर्वीही अनेक देशांना मदतीचा हात दिला आहे. ओमिक्रोनने दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घातला असताना भारत संकटाच्या काळात आफ्रिकन देशांच्या कठीण समयी पाठिशी उभा राहिला होता. भारत सरकारने ओमिक्रोन प्रभावित झालेल्या आफ्रिकन देशांना कोरोना प्रतिबंधक लस, पीपीई किट आणि इतर साहित्य पुरवले होते. भारताच्या या निर्णयाचे क्रिकेटपटू केविन पीटरसन याने स्वागत केले होते आणि भारताचे आभार मानले होते.

Exit mobile version