24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियाझांबियात कॉलराचे थैमान, भारताकडून मदतीचा हात!

झांबियात कॉलराचे थैमान, भारताकडून मदतीचा हात!

देशात आतापर्यंत ६०० जणांचा मृत्यू तर १५,००० हून अधिकांना लागण

Google News Follow

Related

झांबिया देशात कॉलराने थैमान घातला आहे.कॉलराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश धडपड करत आहे.या आजारात अनेकांनी आपला जीव गमावला.अनेक देशांकडून झांबियाला मदत पाठवण्यात आली.या मानवतावादी मदतीमध्ये भारताने देखील हात पुढे केला आहे.भारताने झांबिया देशाला औषधी वस्तूंचा संच पाठवला आहे.भारताकडून पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये, पाणी शुद्धीकरण मशीन, क्लोरीन गोळ्या आणि हायड्रेशनचा समावेश असलेले ओआरएसचे पॅकेट्स आहेत.परराष्ट्र मंत्रालयाने मदतीबाबत माहिती दिली.

परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) दिलेल्या माहितीनुसार, भारताने मंगळवारी व्यावसायिक मालवाहू विमानांद्वारे झांबियाला मानवतावादी मदत पाठविण्यात आली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, झांबियाला पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये पाणी शुद्धीकरण मशीन, क्लोरीन गोळ्या आणि हायड्रेशनचा समावेश असलेले ओआरएसचे पॅकेट्स असून अंदाजे ३.५ टन इतके याचे वजन आहे.दरम्यान, बीबीसीच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर-२०२३ पासून जवळजवळ ६०० लोक मारले गेले आणि १५,००० हून अधिक लोक कॉलरामुळे संक्रमित झाले आहेत.झांबियाच्या १० प्रांतांपैकी नऊ प्रांतांमध्ये कॉलराची प्रकरणे नोंदली गेली आहेत.

हे ही वाचा:

लिव्ह इनची नोंदणी, हलाला, इद्दतवर बंदी….उत्तराखंड समान नागरी विधेयक सादर

हिमाचलमध्ये भूस्खलन, २ मजुरांचा मृत्यू तर ५ जण जखमी!

अरविंद केजरीवालांच्या पीएसह आप नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे!

सर्दी-खोकल्यासाठी सर्रास दिल्या जाणाऱ्या औषधांच्या पुनर्तपासणीचे निर्देश

आजराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे.सरकारने सामूहिक लसीकरण कार्यक्रम देखील सुरु केले आहेत.तसेच आजाराने संक्रमित झालेले जे नागरिक आहेत त्यांना दररोज २.४ दशलक्ष लिटर – स्वच्छ पाणी पुरवण्याचे काम सरकारी अधिकारी करत आहेत. देशव्यापी जनजागृती मोहीमही राबविण्यात आली आहे.बिघडलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशाला सेवानिवृत्त झालेले आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक याना एकत्र करावे लागले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा