भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताकडून वैद्यकीय गोष्टींसह १५ टन मदत साहित्य रवाना

पंतप्रधान मोदींनी मदतीसाठी दिले होते आश्वासन

भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताकडून वैद्यकीय गोष्टींसह १५ टन मदत साहित्य रवाना

म्यानमार आणि थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकला शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाने हादरवून टाकले. म्यानमारमधील उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे ६९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, मेघालय आणि मणिपूरसह भारतातील काही भागात तसेच बांगलादेशात, विशेषतः ढाका आणि चट्टोग्राम आणि चीनमध्येही जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. यानंतर भारताने तातडीने म्यानमारला मदतीचे आश्वासन दिले. पंतप्रधान मोदींनी याबाबत माहिती दिली.

भारताने दिलेल्या आश्वासनानुसार आता भारत म्यानमारला सुमारे १५ टन मदत साहित्य पाठवत आहे. हिंडन एअर फोर्स स्टेशनवरून आयएएफ सी- 130 या विमानाने ही मदत सामग्री म्यानमारला पाठवण्यात येत आहे. मदत साहित्यात तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, रेडी-टू-ईट जेवण, वॉटर प्युरिफायर, हायजीन किट, सोलर लॅम्प, जनरेटर सेट अशा वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, कॅन्युला, सिरिंज, हातमोजे, कापसाच्या पट्ट्या आणि लघवीच्या पिशव्या यासारख्या वैद्यकीय गोष्टींचाही समावेश आहे. भारताने म्यानमारच्या लोकांसाठी तातडीच्या मानवतावादी मदतीचा हा पहिला रवाना केला आहे.

शुक्रवारी, म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये भूकंप झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत सांगितले की, भारत सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे. कोलकाता आणि इंफाळसह अनेक भारतीय शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

एक्सवरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदींनी भूकंपाबद्दल चिंता व्यक्त केली आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. “म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीबद्दल चिंतेत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. भारत सर्व शक्य ती मदत करण्यास तयार आहे. या संदर्भात, आमच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे,” असे त्यांनी लिहिले.

हे ही वाचा : 

“आरोग्यासाठी वरदान आहे त्रिफळा, पचनशक्तीपासून रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत लाभदायक”

उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्व आठवलं नाही का?

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निकोलस पूरन आघाडीवर

‘पूरनसोबत फलंदाजी करणे रोमांचक’ : मार्श

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू हा सागाईंग शहरापासून १६ किमी वायव्येस आणि १० किमी खोलीवर होता. म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवताच उंच इमारती अक्षरशः पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळताना दिसल्या. पूल, रस्ते आदींचे नुकसान झाले. भूकंपानंतर म्यानमारने सहा सर्वाधिक प्रभावित प्रदेशांमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर केली. बँकॉकमध्येही आपत्कालीन क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तेथील काही मेट्रो आणि रेल्वे सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत.

सतीश सालियन यांना बकरा बनवण्याची तयारी होती...| Dinesh Kanji | Disha Salian | Satish Salian

Exit mobile version