अफगाणिस्तानवर तालिबानींनी कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तेथील परिस्थिती पाहता भारताने आपले व्हिसा नियम बदलले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. या व्हिसाला ई-आणीबाणी एक्स-मिस्क व्हिसा असे म्हटले आहे. भारतात येण्यासाठी व्हिसा अर्ज फास्ट ट्रॅक करणे हा त्याचा हेतू आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये एक हजाराहून अधिक भारतीय अडकले आहेत आणि भारतीय हवाई दलाचे विमान तेथे अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करीत आहे.
#BREAKING: India begins e-visa facility to accommodate Afghan refugees amidst Taliban takeover. E-Emergency X-Misc created for this purpose. Applications to be considered case by case basis by the Government.
Apply on this link: https://t.co/jp8GJ0q3AC pic.twitter.com/Yk26pZ2yUS
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 17, 2021
व्हिसाशी संबंधित समस्यांसाठी असलेल्या नोडल मंत्रालयाने या नवीन व्हिसासंदर्भात मंगळवारी घोषणा केली आहे. इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी देखील गृह मंत्रालयाकडून ट्विट करून सांगण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून असे सांगण्यात आले आहे की भारताने व्हिसाची एक नवीन श्रेणी सुरू केली आहे जेणेकरून व्हिसाची प्रक्रिया सुलभ आणि लहान करता येईल. यासह, अडचणीत अडकलेल्या गरजूंना त्वरित मदत दिली जाईल. काबुलमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटनुसार, भारतात प्रवेश करण्यासाठी दोन प्रकारचे व्हिसा आवश्यक आहेत.
एक्स व्हिसा म्हणजेच, एंट्री व्हिसा जो भारतीय वंशाच्या व्यक्तीला दिला जातो. भारतीय वंशाच्या व्यक्ती व्यतिरिक्त, हा व्हिसा त्याच्या जोडीदाराला, मुलांना आणि भारतीय वंशाच्या आश्रित कुटुंब सदस्यांना दिला जातो. हा व्हिसा इतर व्हिसा श्रेणींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही अशा हेतूंसाठी जारी केला जातो.
हे ही वाचा:
तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा
अफगाणिस्तानमध्ये विमानातही चेंगराचेंगरी
मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस
एक्स-मिस्क हा व्हिसा म्हणजे भारतात येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला दिलेला प्रवेश व्हिसा. हा व्हिसा जारी करण्याचा उद्देश हा आहे की भारतात येणाऱ्या व्यक्तीला दिल्लीतील तिसऱ्या देशाच्या दूतावासात व्हिसा मुलाखतीसाठी भारतात येण्याची परवानगी द्यावी. हा व्हिसा प्रत्येक देशातील नागरिकांसाठी आहे, परंतु सध्या भारताने केवळ अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी आपत्कालीन इलेक्ट्रॉनिक व्हिसाची सुविधा सुरू केली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की जर अफगाणिस्तानातील कोणत्याही व्यक्तीला भारतात येऊन इतर देशात जायचे असेल तर तो ई-आपत्कालीन एक्स-मिस्क व्हिसाद्वारे येथे येऊ शकतो आणि दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी मुलाखत देऊ शकतो.