25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरदेश दुनियाहुश्श!! भारताने आव्हान जिवंत ठेवले; अफगाणिस्तानवर केली मात

हुश्श!! भारताने आव्हान जिवंत ठेवले; अफगाणिस्तानवर केली मात

Google News Follow

Related

पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात येण्याची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या भारतीय संघाला अखेर सूर सापडला. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने ६६ धावांनी विजय मिळवत गुणांचे खाते उघडले.

हा विजय मिळविल्यानंतरही भारताला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात या सामन्यात चांगली झाली.

के.एल. राहुल (६९) आणि रोहित शर्मा (७४) यांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत २ बाद २१० धावा केल्या. हार्दिक पंड्याने १३ चेंडूंत ३५ तर ऋषभ पंतने २७ धावांची नाबाद खेळी करत भारताच्या या धावसंख्येला आकार दिला.

अफगाणिस्तानला मात्र या आव्हानाचा सामना करता आला नाही. तळाचा फलंदाज करीम जनत याने ४२ धावांची सर्वोच्च खेळी केली तर कर्णधार मोहम्मद नबीने ३५ धावा केल्या. पण अन्य फलंदाजांकडून निराशाच पदरी पडली. त्यामुळे निर्धारित २० षटकांत अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावा करता आल्या.

 

हे ही वाचा:

आता मला कोणतीही माहिती देण्याची इच्छा नाही

मोदी सरकारकडून देशवासियांना दिवाळीची भेट

१२०० कादंबऱ्यांचे लेखक, रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक कालवश

शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?

 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीमुळे टीकेचा धनी बनलेल्या मोहम्मद शमीने ३२ धावा देत ३ बळी घेतले.

सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला सलामीवीर रोहित शर्मा.

भारताने अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळविला असला तरी आगामी सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला नमविणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर भारताच्या आव्हानाला तडा जाणार आहे.

स्कोअरबोर्ड

भारत २ बाद २१० (राहुल ६९,रोहित शर्मा ७४, ऋषभ पंत ना. २७, हार्दिक ना. ३५) विजयी वि. अफगाणिस्तान ७ बाद १४४ (करिम जनत नाबाद ४२. मोहम्मद नबी ३५, शमी ३२-३, अश्विन १४-२)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा