स्पुतनिक-वी भारतात दाखल

स्पुतनिक-वी भारतात दाखल

कोरोनाविरोधात प्रभावशाली असणारी स्पुतनिक-व्ही लस १ मे रोजी संध्याकाळी भारतात दाखल झाली आहे. रशियातून लसीची पहिली खेप घेऊन हैद्राबाद विमानतळावर विमान उतरले. या लसीमुळे भारताच्या कोवीड विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ मिळणार आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने डाळ सडवली

भारतातील दर दहापैकी एका रुग्णाला रिलायन्स निर्मित प्राणवायूचा पुरवठा

चुकांमधून न शिकणारे ठाकरे सरकार कोरोनाबाबतीत पुनश्चः अपयशी

गुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू

भारताच्या लसीकरण मोहिमेची मदार आजपर्यंत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींवर अवलंबून राहिली आहे. परंतु सध्या लसीकरणचा परिघ वाढवण्यासाठी अधिकाधीक लसींची गरज आहे. केंद्र सरकारने ही गरज लक्षात घेऊन इतर चार लसींना देखील मान्यता दिली आहे. त्यापैकी रशियाने निर्माण केलेल्या स्पुतनिक लसीची पहिली खेप आज भारतात दाखल झाली आहे.

स्पुतनिक लसीच्या या पहिल्या खेपेत डिड ते दोन लाख लसी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मे महिन्या च्या अखेरीस तीस लाख लसींची आणखीन के खेप येणार आहे. तर जून महिन्यात पन्नास लाख लसींची खेप भारतात दाखल होणार आहे. लवकरच या लसीचे भारतात उत्पादन सुरु होणार आहे.

लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकशास्त्रातील नियतकालिकानुसार या लसीची परिणामकारकता ९१.६% आहे. ही लस १८ वर्षांवरील सर्वांना देण्यास योग्य असल्याचे सांगितले जात आहे. ही लस उणे १८ अंश सेल्सियसवर द्रवरूपात साठवून ठेवावी लागते. परंतु ही लस २ ते ८ अंश सेल्सियसवर गोठवलेल्या कोरड्या स्वरूपातही साठवता येते, त्यामुळे या लसीचे वहन सुकर झाले.

आजपासून देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाधीक लसींची गरज भासणार आहे. त्यापैकी पहिली स्पुतनिक लस भारतात आज दाखल झाली आहे.

Exit mobile version