27.9 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरदेश दुनियाभारताला मिळाली ५ हजार ऑक्सिजन सिलेंडर, ४ लाख रेमडेसिवीरची मदत

भारताला मिळाली ५ हजार ऑक्सिजन सिलेंडर, ४ लाख रेमडेसिवीरची मदत

Google News Follow

Related

भारतामध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. भारतात दररोज लक्षावधी रुग्णांची वाढ होत आहे. भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. त्यामुळे भारताला विविध देशांमधून २७ एप्रिल पासून मदत पाठवायला सुरूवात केली. आजवर भारताला हजारोंच्या संख्येने ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर इत्यादी प्राप्त झाले आहेतच. त्याशिवाय लक्षावधी रेमडेसिवीर सुद्धा मिळाले आहेत.

भारत सरकारच्या विविध विभागांनी ही मदत राज्यांपर्यंत पोहोचवायला सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी एकमेकांसोबतचा ताळमेळ देखील अधिकाधीक उत्तम करायला सुरूवात केली.

हे ही वाचा :

मुंबईला मिळणार  ३०० ‘सुपर सेव्हर्स’ 

नेपाळमधील ओलींचे कम्युनिस्ट सरकार पडले

क्रिकेट बुकी जालान म्हणतो, परमबीर सिंह यांनी माझ्याकडून खंडणी उकळली

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर मिळणार काँग्रेसला अध्यक्ष

सरकाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार भारताला आत्तापर्यंत विविध देशांकडून ५०४३ ऑक्सिजन सिलेंडर, १८ ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट, ५६९८ व्हेंटिलेटर आणि ३.४ लाख रेमडेसिवर प्राप्त झाले आहेत.

यासोबतच भारताचे आरोग्य मंत्रालय या सर्व मदतीच्या योग्य वितरणावर लक्ष ठेवून आहे. या सुसुत्रीकरणाच्या कामासाठी मंत्रालयाने एक वेगळा को-ऑर्डिनेश सेल स्थापन केला आहे. हा विभाग परदेशातून येणारी मदत स्वीकारणे आणि ती राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. हा सेल २६ एप्रिल २०२१ पासून कार्यरत आहे. या कामाच एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर देखील २ मे २०२१ पासून अंमलात आणली गेली आहे.

भारतातील रूग्णवाढ गेले काही दिवस ४ लाखाच्या पार गेली होती. त्यामुळे भारताची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था मोडीत पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या परिस्थितीत भारताला त्याच्या अनेक आंतरराष्ट्रीय मित्रांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा