भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेशी निकराने सामना करत आहे. या कठिण काळात भारताला अनेक देशांनी सहाय्य केले आहे. त्यातच भारताला दक्षिण कोरियाकडून रॅपिड टेस्टिंग किट निगेटिव्ह प्रेशर कॅरियर घेऊन दोन विमाने उतरली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे.
भारताला वेगवेगळ्या देशांकडून मदत प्राप्त होत आहे. कोरियाकडून देखील वैद्यकीय मदत प्राप्त झाली आहे. भारताला १०,००० रॅपिड टेस्टींग किट आणि १०० निगेटिव्ह प्रेशर कॅरियर पाठवण्यात आले होते.
हे ही वाचा:
करुणा ‘धनंजय मुंडें’च्या प्रेमकथेवर लवकरच सिनेमा
नव्या कोविड रुग्णांचा आकडा ३ लाख ५० हजारापेक्षा कमी
अरबी समुद्रात वादळाची निर्मिीती; महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा
जपानला ६ रिश्टरचा भूकंपाचा धक्का
अरिंदम बागची यांनी ट्वीट करताना सांगितले आहे की,
आम्ही कोरियासोबतत सातत्याने सहकार करत आहोत. कोरियाकडून आलेल्या १०,००० रॅपिड टेस्टिंग किटचे स्वागत असो.
त्यानंतर काही तासांनी बागची यांनी ट्वीट केले की,
कोरियाकडून आरोग्य उपकरणे घेऊन येणारे दुसरे विमान पोहोचले. काही तासांच्या अंतरात दोन विमानांमधून कोरियाकडून मदत प्राप्त झाली आहे. या खेपेतून १०० निगेटिव्ह प्रेशक कॅरियर प्राप्त झाले आहेत. सातत्याने केलेल्या या मदतीसाठी कोरियन प्रजासत्ताकाचे मनःपूर्वक आभार
🇮🇳🇰🇷
Aircraft with medical equipment arrives from Republic of Korea. 2nd aircraft to arrive in a span of a few hours. This one with consignment of 100 Negative Pressure Carriers. Thank Republic of Korea for this continuing support. pic.twitter.com/CAFj13hc2F— Arindam Bagchi (@MEAIndia) May 13, 2021
बुधवारी कोरियाने भारताला २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची देखील मदत पाठवली होती. त्यासोबतच रविवारी देखील ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि २०० ऑक्सिजन सिलेंडर आणि त्यासोबत नियंत्रक देखील पाठवले आहेत.
कोरियाच्या दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार कोरिया भारतीय नागरिकांसाठी या कठिण काळात अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची मदत पाठवत आहे.