भारत शस्त्रास्त्रांची निर्यात करायला सज्ज

भारत शस्त्रास्त्रांची निर्यात करायला सज्ज

“हिंदी महासागरातील देशांना शस्त्रास्त्र पुरवण्यासाठी भारत सज्ज आहे.” असे परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. बंगळुरूमध्ये सुरु असलेल्या ऐरो इंडिया या ‘डिफेन्स एक्स्पो’ मध्ये ते बोलत होते. इंडोनेशिया, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, येमेन, संयुक्त अरब अमिराती, सोमालिया, मादागास्कर आणि टांझानिया यासह एकूण २२ देश हे हिंदी महासागरातील देश आहेत.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, “भारत हा हिंद महासागरातील सर्वात मोठा देश असल्याने आणि त्यात विशाल समुद्र किनारपट्टी असल्याने शांततामय व समृद्ध सह-अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी भारताने सक्रीय भूमिका निभावणे आवश्यक आहे.”

“भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगाने पुरवठा साखळीवरील (सप्लाय चेन) आंतरराष्ट्रीय कंपन्यांना त्यांचे सहकार्य नव्या पातळीवर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि आकर्षक संधी सादर केली. केंद्र सरकार, इतर देशांना विविध प्रकारची संरक्षण उपकरणे जसे की क्षेपणास्त्र यंत्रणा, रडार, रणगाडे इत्यादी पुरवण्यासही तयार आहेत.” असेही राजनाथ सिंग यांनी सांगितले.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या वेळी अधिवेशनाचा विषय ‘हिंदी महासागरात शांतता, सुरक्षा आणि सहकार्य प्रस्थापित करणे’ हा होता. बुधवारी राजनाथ सिंग यांनी भारत इंडियन ओशन रिजन (आयओआर) देशांना सुरक्षा प्रदान करू शकतो असे सांगितले.

Exit mobile version