कोणत्याही देशातील लोक पासपोर्टशिवाय दुसऱ्या देशात जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत ज्या देशाचा पासपोर्ट जितका शक्तिशाली असेल तितक्या अधिक सुविधा त्या देशातील लोकांना इतर देशांकडून दिल्या जातात. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स अहवाल हेन्ली अँड पार्टनर्स या इमिग्रेशन सल्लागाराने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंगच्या आधारे यादी जारी करण्यात आली आहे.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, जपानकडे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. जपानला जवळपास १९३ देशांमध्ये कोणत्याही अडचणींशिवाय प्रवेश करता येणार आहे. या यादीत भारत ८७ व्या क्रमांकावर आहे. ज्यामुळे भारतातील लोकांना ६० देशांमध्ये कोणत्याही अडचणींशिवाय प्रवास करता येणार आहे. पाकिस्तान या यादीत १०९ व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या यादीत रशिया ५०व्या, चीन ६९ व्या स्थानावर आहे. या यादीतील युरोपचे वर्चस्व हळूहळू कमी होत असून जर्मनी आता दक्षिण कोरियाच्या मागे आहे.
हे ही वाचा:
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र
जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये जपान पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर संयुक्तपणे दक्षिण कोरिया आणि सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनी आणि स्पेन संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फिनलंड, इटली आणि लक्झेंबर्ग संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहेत. यासह ऑस्ट्रिया, डेन्मार्क, स्वीडन आणि नेदरलँड संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.