भारत-पाकिस्तानात पाण्यावरून चर्चा

भारत-पाकिस्तानात पाण्यावरून चर्चा

भारत- पाकिस्तान सिंधु आयोगाच्या अधिकाऱ्यांची २३-२४ मार्च रोजी नवी दिल्ली येथे भेट होणार आहे. स्थायी सिंधु आयोगाच्या वार्षिक बैठकीसाठी ही भेट होणार आहे.

भारताचे प्रदिप कुमार सक्सेना यांच्या नेतृत्वात भारतीय शिष्टमंडळ या बैठकीसाठी जाणार आहे. त्यांनी इंडिय एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली येथे २३-२४ मार्च रोजी स्थायी सिंधु आयोगाची बैठक होणार आहे. आम्ही करारानुसार मिळालेल्या भारताच्या वाटच्या हक्काच्या संपूर्ण वापरासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की, चर्चेद्वारे सर्वमान्य तोडगा शांततेने काढला जाऊ शकतो.

हे ही वाचा:

सचिन वाझे यांचे निलंबन

विरोधकांकडून सरकारवर निशाणा

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट?

भारत-पाकिस्तान या दोन्ही शेजारील देशांमध्ये १९६० साली पाणी वाटपासाठी सिंधु करार करण्यात आला. या करारानुसार स्थायी सिंधु आयोगाची दरवर्षी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. भारत पाकिस्तान यांच्यातील स्थायी सिंधु आयोगाची वार्षिक बैठक एकदा भारतात तर एकदा पाकिस्तानात आयोजित केली जाते.

सुमारे दोन वर्षांच्या कालावधीनंतर स्थायी सिंधु आयोगाची बैठक होत आहे. यापूर्वीची बैठक २९-३० ऑगस्ट २०१८ रोजी पाकिस्तानातील लाहोर येथे झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही बैठक घेणे शक्य झाले नव्हते. भारताने ही बैठक व्हर्च्यअली घ्यावी अशी सुचना केली होती. मात्र पाकिस्तानने याला नकार देत ही बैठक अटारी सीमेवर घेण्याची सुचना केली होती. मात्र कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारताने ही सुचना फेटाळून लावली.

त्यानंतर आता कोविडचे सगळे निर्बंध पाळून ही बैठक दिल्ली येथे होणार आहे.

Exit mobile version