भारत हा जगातील सर्वात मोठा काकडीचा निर्यातदार देश म्हणून उदयास आला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या काळात (२०२०-२१) भारताने जगात काकडी आणि लोणच्याच्या काकडीची एक लाख २३ हजार ८४६ मेट्रिक टन म्हणजेच, ११४ दक्षलक्ष डॉलर्सची निर्यात केली आहे.
भारताने गेल्या आर्थिक वर्षात, कृषि प्रक्रिया उत्पादने, लोणच्याची काकडी अशा पदार्थांच्या उत्पादनात, दोनशे दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक मूल्यांची निर्यात केली गेली. जगभरात काकडी आणि लोणच्याची काकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काकडीची कृषिमालात देशाच्या निर्यातीत वाढ केली आहे. २०२०-२१ या वर्षात, भारताने तब्बल दोन लाख २३ हजार ५१५ मेट्रिक टन काकडीची निर्यात केली आहे. याचे मूल्य जवळपास २२३ दशलक्ष डॉलर्स एवढे आहे.
काकडीची लागवड, प्रक्रिया आणि निर्यात भारतात १९९० च्या दशकात कर्नाटकात अल्प प्रमाणात सुरू झाली. नंतर शेजारील तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून काकडीवर प्रक्रिया करून निर्यात केली जात असे. जगाच्या गरजेच्या १५ टक्के काकडीचे उत्पादन भारतात केले जाते.
वीसपेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून काकडी निर्यात केली जाते. यामध्ये उत्तर अमेरिका, युरोपियन देश आणि युनायटेड स्टेट्स, फ्रान्स, जर्मनी ,ऑस्ट्रेलिया ,स्पेन दक्षिण अमेरिका कोरिया, कॅनडा हे निर्यातीचे मुख्य देश आहेत. ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये काकडी उद्योग महत्वाची भूमिका बाजवते. भारतात ६५ हजार एकर वार्षिक उत्पादन क्षेत्रासह सुमारे ९० हजार शेतकरी काकडीची लागवड करतात.
हे ही वाचा:
शेअर बाजारात झोमॅटो, नायकाची झाली घसरण…
कर्नाटकच्या शाळेत नमाज पढण्याचे प्रकरण तापले… हिंदू संघटनांचे चौकशीचे आदेश
…म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन
सरासरी, एक शेतकरी प्रति एकर, चार मेट्रिक टन काकडी उत्पादन करतो आणि ४० हजार रुपयांच्या निव्वळ उत्पादनासह सुमारे ८० हजार रुपये कमवतो. काकडीचे पीक ९० दिवसांचे असते आणि वर्षातून दोन वेळा शेतकरी काकडीचे पीक घेतो.