लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जगातील तिसरा देश

लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जगातील तिसरा देश

चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना तोंड देण्यासाठी भारतीय सैन्यदल आपली ताकद वाढवण्यात नेहमी गुंतलेले असते. सध्या भारताकडे चीननंतरचे सर्वात मोठे सैन्यदल आहे. भारत सरकार लष्कर, हवाई दल आणि नौदलामध्ये सुधारणा करत आहे. लष्कर नवीन शस्त्रे खरेदी करत असून, त्यामुळे लष्कराचे बजेटही वाढले आहे. यामुळेच लष्करावरील खर्चाच्या बाबतीत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार, भारताने २०२१ मध्ये सैन्यावर ७६.६ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. २०२० च्या तुलनेत हा खर्च ०.९ टक्क्यांनी जास्त आणि २०१२ च्या तुलनेत सुमारे ३३ टक्क्यांनी हा खर्च वाढला आहे. त्यामुळे भारत आता जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे लष्कर झाले आहे.

मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी, केंद्र सरकारने २०२१ च्या भारताच्या लष्करी बजेटमधील भांडवली खर्चात ६४ टक्के रक्कम देशांतर्गत उत्पादित शस्त्रे खरेदीवर खर्च केली आहेत. देशात शस्त्रास्त्रांच्या उत्पादनाला गती देण्यासाठी सरकारने मोठ्या संरक्षण बजेटची घोषणा केली होती. स्वावलंबी होण्यासाठी भारत आता शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर मोठा खर्च करत आहे.

हे ही वाचा:

जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप

…आणि देवेंद्र फडणवीसांनी म्हटली हनुमान चालीसा

सोमय्याप्रकरणी महाडेश्वरांना अटक व जामीन

फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती

दरम्यान, जगात लष्करावर सर्वाधिक खर्च अमेरिका, भारत, अमेरिका, ब्रिटन आणि रशिया हे पाच देश करतात. हे पाच देश जगाच्या खर्चापैकी ६२ टक्के खर्च करतात. जगात अमेरिका लष्कर खर्चात पहिल्या क्रमांकर तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्टॉकहोम ने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये जगातील एकूण लष्करी खर्चात ०.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Exit mobile version