25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनिया'भारताने एक इंचही कोणाची जमीन बळकावलेली नाही'

‘भारताने एक इंचही कोणाची जमीन बळकावलेली नाही’

Google News Follow

Related

भारत हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याने कधीही इतर देशांची एक इंचही जमीन बळकावलेली नाही. दिल्ली विद्यापीठाच्या ९८ व्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी हे वक्त्यव्य केले आहे. भारताची सत्ता ही जगाच्या कल्याणासाठी असून कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, असे राजनाथ म्हणाले आहेत.

” भारताला जगतगुरू बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. आम्हाला देश शक्तिशाली, समृद्ध, ज्ञानसंपन्न आणि मौल्यवान बनवायचा आहे. भारत हा एकमेव देश आहे ज्याने कधीही इतर कोणत्याही देशाच्या एक इंच जमिनीवरही हल्ला केलेला नाही किंवा त्यावर कब्जा केलेला नाही. स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवात देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना आपण समता, समरसता आणि ज्ञानाची महान परंपरा लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या आत दडलेले विष काढून टाकण्याची क्षमता आपण आत्मसात केली पाहिजे.”

देशाच्या अध्यात्मिक शक्तीबद्दल बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकेरबर्ग सारखे लोक देखील नैनीताल जवळील कांची धाम येथील नीम करोली बाबाकडे संकटकाळात शांतीसाठी गेले होते. त्यांनी तरुणांना देशहिताच्या विरोधात कोणतीही कृती न करण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. अफझल गुरू, याकूब मेमन आणि अमेरिकास्थित ट्विन टॉवर्सवरील हल्लेखोरांची नावे सांगून ते म्हणाले की, दहशतवादाचे कारण गरिबी आणि शिक्षणाचा अभाव आहे असा लोकांचा गैरसमज आहे.

हे ही वाचा:

कोर्टाने लिएंडर पेसला कौटुंबिक हिंसाचारात ठरवले दोषी

रशिया – युक्रेन युद्धात युक्रेनची पहिली महिला पायलट ठार

मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण

हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वा. सावरकरांचा विसर

या कार्यक्रमात सिंग यांनी १९७ विद्यार्थ्यांना पदके प्रदान केली तसेच ८०२ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली. या कार्यक्रमाला कुलगुरू योगेश सिंह हे देखील उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा