ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी रशियाला रवाना झाले आहेत. कझान येथे १६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कझानमध्ये शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांना मिठी मारली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली.
पुतीन यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या प्रेमळ आदरतिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी कझान शहराशी भारताच्या ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख केला आणि सांगितले की, भारत कझानमध्ये नवीन वाणिज्य दूतावास उघडत आहे. तसेच नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत दुसऱ्यांदा रशियाला आलो आहे. या वर्षी जुलैमध्ये मी मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली. यामुळे भारत आणि रशियामधील संबंध अधिक दृढ झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा चर्चेदरम्यान शांततेच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. रशिया- युक्रेन संघर्षाच्या काळात राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि मी सतत संपर्कात आहोत. भारताचा असा विश्वास आहे की संघर्षाचे निराकरण शांततापूर्ण असावे. आम्ही मानवजातीची काळजी घेत शांतता आणि स्थिरतेचे समर्थन करतो. याबाबत भारत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहे.
हे ही वाचा..
आरजी कार पीडीतेच्या वडिलांनी मागितली अमित शहांकडे वेळ
हिंदूविरोधी राजकीय हिंसाचार करून बांगलादेशाने आपल्या पायावर धोंडा मारला!
वक्फ विधेयक बैठकीत टीएमसी खासदाराने बाटली फोडली
सेबीच्या प्रमुख माधबी पुरी- बुच यांना हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमधून क्लीनचीट
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की, “मला आठवते की आम्ही जुलैमध्ये भेटलो होतो. तेव्हा अनेक मुद्द्यांवर चांगली चर्चा झाली होती. आजही आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. समस्या आम्ही अनेक वेळा फोनवर बोललो आणि मी तुमचा खूप आभारी आहे.