‘भारत देश हा माझ्यासाठी सर्वस्व आहे’. मी जे काही कमवले आहे, जे काही मिळवले आहे ते इथूनच आहे आणि मी नशीबवान आहे कि मला ते परत करण्याची संधी मिळाली. जेव्हा नकळत लोक आपल्याबद्दल काहीही बोलतात त्यावेळेस वाईट वाटते. जेव्हा ९० च्या दशकांत माझे चित्रपट चालत नव्हते तेव्हा मी कॅनेडीअन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. माझा मित्र कॅनडाला राहतो तो म्हणाला इथे ये काम मिळेल म्हणून मी कॅनडा मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि तिकडे गेलो होतो असे एका मुलाखतीत अक्षय कुमार याने सांगितले.
पुढे अक्षय कुमार असे म्हणला कि , माझे दोन चित्रपट आले आणि ते जोरात चालले तेव्हा माझा मित्र मला म्हणाला कि तू आता परत जा , काम मिळेल परत आल्यावर मला काम मिळू लागले. माझे चित्रपट चालण्याचा सिलसिला सुरूच झाला, पण पासपोर्ट बदलायचा आहे हे माझ्या लक्षातच आले नाही. पण होय आता मी पासपोर्ट बदलणार आहे. एकदा मला कॅनडामधून त्याग केलेला दर्जा मिळाला कि माझा भारतीय पासपोर्ट मिळेल.
अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कॅनेडीअन नागरिकत्वामुळे चर्चेत असतो. त्याचे कॅनडाचे नागरिकत्व यावर त्याला ट्रोल केले जाते. अक्षयने तीन वर्षांपूर्वी त्याच्या चाहत्यांना वचन दिले होते की, तो भारतीय पासपोर्टसाठी लवकरच अर्ज करणार आहे. एप्रिल २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीनंतर अक्षय कुमारचे नागरिकत्व हा मोठा चर्चेचा विषय बनला होता.
हे ही वाचा:
भारत ते गयाना लवकरच थेट विमानसेवा
मैदानी चाचणी दरम्यान दुसऱ्या भरती उमेदवाराचा मृत्यु
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा पुतळा जाळण्यास सांगितला
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
अक्षय कुमारचा आज २४ फेब्रुवारीला ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ह्यात त्याच्याबरोबर इम्रान हाश्मी आणि नुसरत भरूचा असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता हे करणार असून मल्याळम चित्रपट ड्रायविंग लायसन्स या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. याशिवाय अक्षय कुमार याचा टायगर श्रॉफ सोबत बडे मिया छोटे मियाँ हा चित्रपट येणार आहे. याशिवाय अक्षयकडे ओह माय गॉड -२ , फार हिअरा फेरी -२ हे चित्रपट झळकणार आहेत.