भारतामध्ये जागतिक सिरम इन्स्टिट्युट सारखा लसींचा जागतिक पुरवठादार आहे, हे भारताचे भाग्य आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मॅलपास यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकीपूर्वी माध्यमांशी साधलेल्या संवादात हे उद्गार काढले होते.
ते म्हणाले, “मी सिरम इन्स्टिट्युटसोबत सातत्याने संपर्कात आहे. भारतात अशी संस्था आहे हे भारताचे भाग्यच आहे.”
“युनायटेड स्टेट्स असो, युरोप किंवा दक्षिण आफ्रिका किंवा भारत त्यांच्या स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक उत्पादनाच्या अटी काय आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. मी भारताच्या वाढत्या देशांतर्गत लसीकरण मोहिमेमुळे प्रभावित झालो आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत या संदर्भात सातत्याने काम करत आहोत. ती जगासाठी प्राथमिकता आहे”, असे मॅलपास म्हणाले.
हे ही वाचा:
राज्य सरकारकने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार
बडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से
“उत्पादनाच्या मर्यादा अगणित असल्याने आम्ही करत असलेली लसीकरण मोहिम राबवायला प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. विकसनशील देशांमध्ये लस पोहोचणं हे अत्यावश्यक आहे, कारण ती प्रत्यक्षात टोचली जायला खूप वेळ जातो” असेही त्यांनी सांगितले.
मॅलपास असेही म्हणाले की, “मला असे वाटते की, गरीब देशांसकट विकसनशील देशांना त्यांच्या वापरासाठीच आधी लस मिळाली पाहिजे, जेणेमुळे त्यांच्या लसीकरण मोहिमेला सुरूवात होईल.”
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षीच्या मध्यापर्यंत जागतिक बँक ५० देशांशी आर्थिक करार केले आहेत. ही आर्थिक मदत जगात उपलब्ध असलेल्या लसी खरेदी करायला वापरली जाऊ शकेल.