स्वीडिश थिंक टँकने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, अण्वस्त्रांच्या संख्येत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. तर, भारताचा शेजारी देश असलेल्या चीनने आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात वाढ केली आहे. चीनच्या अण्वस्त्रांची संख्या ५०० पर्यंत पोहचली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (SIPRI) आपल्या अहवालात म्हटले आहे की, अण्वस्त्रांनी सज्ज असलेले नऊ देश आणि त्यात भारत, पाकिस्तान आणि चीन यांचाही समावेश आहे. त्यांची अण्वस्त्रे वाढवत आहेत आणि त्यांचे आधुनिकीकरण करत आहेत.
अहवालानुसार, जगभरात २ हजार १०० अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी बहुतांश रशिया आणि अमेरिकेकडे आहेत. सर्व रशियन आणि यूएस शस्त्रे उच्च ऑपरेशनल अलर्टवर आहेत आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या युद्ध प्रमुख प्रणालीसह वापरण्यासाठी तयार आहेत. काही अहवालांनुसार, चीनने प्रथमच आपली अण्वस्त्रे हाय ऑपरेशनल अलर्ट मोडवर ठेवली आहेत. भारताकडे १७२ अण्वस्त्रे आहेत. SIPRI अहवालानुसार भारताकडे जानेवारी २०२४ पर्यंत १७२ अण्वस्त्रे होती, जी पाकिस्तानच्या १७० अण्वस्त्रांपेक्षा दोनने अधिक आहेत.
हे ही वाचा:
इटलीच्या किनारपट्टीनजीक स्थलांतरितांचे जहाज बुडून ११ जणांचा मृत्यू
विश्वचषक स्पर्धेच्या सुपर आठमध्ये फिरकीपटू कमाल दाखवतील
‘मैतेई-कुकी समाजाशी केंद्र सरकार चर्चा करणार’
SIPRI ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे मुख्य लक्ष्य भारत आहे, तर भारत चीनच्या संपूर्ण भूभागापर्यंत पोहोचू शकणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया अमेरिका आणि रशियासारख्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर अण्वस्त्रे बसवण्याच्या तयारीत असल्याचेही SIPRI अहवालात म्हटले आहे. चीनबद्दल बोलताना SIPRI चे हॅनेस ख्रिश्चन म्हणाले की, या देशाने इतर कोणत्याही देशापेक्षा वेगाने अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे.