युनायटेड किंगडमने पुढच्या महिन्यात लंडन येथे होणाऱ्या जी७ परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण भारताला दिले आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या या परिषदेत भारत देखील सहभागी होईल अशी चिन्हे दिसत आहेत.
लंडनमध्ये सात राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची होणारी ही बैठक ३ ते ५ मे या कालावधीत होणार आहे. या सात राष्ट्रांमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. ही बैठक पहिली प्रत्यक्ष होणारी बैठक ठरणार आहे. यावेळेत कोविड-१९च्या संपूर्ण खबरदाऱ्यांचे पालन केले जाणार आहे.
हे ही वाचा:
राज्यात आणीबाणी लावा- काँग्रेस आमदाराचेच मोदींना पत्र
कोरोनाच्या पार्शवभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केवळ तातडीच्या केसेसवरच सुनावणी होणार
धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण
पाकिस्तानमध्ये ‘या’ कारणामुळे हिंसाचार सुरूच
इंडो-पॅसिफिक भारतातील महत्त्वपूर्ण देश म्हणून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
ब्रिटनच्या फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसने (एफसीडीओ) दिलेल्या माहितीनुसार भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, कोरिया, दक्षिण आफ्रिका देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरच एसियन गटाचे मुख्य सचिव यांना देखील या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी ही परिषद म्हणजे, जागतिक महामारीविरुद्ध कशाप्रकारे जगातील सर्वात मोठ्या लोकशाह्या एकत्र येऊन लसींच्या समन्यायी वाटपसाठी, कोरोनोत्तर काळात पुन्हा उभे राहण्यासाठी, गरीब राष्ट्रांमधील मुलींच्या उत्तम प्रतीच्या शिक्षणासाठी आणि पर्यावरणीय बदलाविरोधात लढण्यासाठी काम करू शकतात हे सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे, असे मत व्यक्त केले आहे.