भारतात मोठ्या प्रमाणात सौर उर्जेला प्राधान्य द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भारतात सौर उर्जा प्रकल्प अधिकाधीक प्रमाणात निर्माण होऊ लागले आहेत. यापैकी एक प्रकल्प म्हणजे सिंगारेनी कोलिअरीज् कंपनी लिमिटेड (एससीसीएल) स्थापन करत असलेला सौर उर्जा प्रकल्प आहे.
सिंगारेनी येथील ५० मेगावॅट उर्जेच्या सौर उर्जा प्रकल्पापैकी १५ मेगावॅट क्षमतेचा भाग, ग्रिडसोबत जोडण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ५० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पापैकी १५ मेगावॅट निर्मीती क्षमतेचा भाग यापूर्वीच ग्रिडसोबत जोडण्यात आला आहे. २७ नोव्हेंबर रोजी केलेल्या या जोडणीमुळे ३० मेगावॅट ट्रान्सको सोबत जोडले गेले होते. यानंतर प्रकल्पाच्या एकूण १२९ मेगावॅटपैकी पहिल्या टप्प्यातील ८५ मेगावॅट ट्रान्सकोसोबत जोडले गेले आहेत. उर्वरित २० मेगावॅट या महिन्याच्या अखेरपर्यंत ग्रिडसोबत जोडले जातील.
उर्वरित ४४ मेगावॅट करता क्षमता निर्मीतीचे कामकाज वेगाने चालू आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील एकूण १२९ मेगावॅट क्षमतेच्या निर्मीतीचे लक्ष्य पूर्ण होऊ शकेल. इतक्या मोठ्या प्रमाणातील वीज निर्मीतीसाठी १८.५५ मिलीयन युनिट्सचा वापर करण्यात आला आहे. हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.