जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा WHO ने केला आहे. मात्र या आकडेवारीवारीवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला असून ही आकडेवारी प्रत्यक्ष आकडेवारीपेक्षा दहा पट असल्याचे म्हटले आहे.
भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण अधिकृत आकडा ५.२ लाखांच्या जवळ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली संख्या ही भारतातील अधिकृत आकडेवारीपेक्षा १० पटीने जास्त आहे. यावर भारत सरकारने आक्षेप नोंदवला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नोव्हेंबरपासून या संदर्भात WHO ला १० पत्रे लिहिली आहेत. मात्र, WHO ने एकाही पत्राला उत्तर दिल्याचे समोर आले आहे. तसेच WHO ने कोरोना मृत्यूची आकडेवारी राज्यांच्या संकेतस्थळांवरून, आरटीआय आणि दूरध्वनी सर्वेक्षणाच्या हवाल्याने वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून घेण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारी का घेण्यात आली नाही? असा सवाल भारत सरकारने उपस्थित केला आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने मॉडेल, डेटा संकलन, डेटा स्रोत, प्रक्रिया (पद्धती) कोणती वापरली? यावर आक्षेप असल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा
जम्मू-काश्मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार
‘कोरोना संपताच CAA लागू होणार’
२०२४ साली इस्रो करणार ‘शुक्र’ मोहीम
WHO ने आकडेवारी जाहीर करताना काही राज्यांची आकडेवारी घेतली तेव्हा या राज्यांची निवड कशावरून केली असा सवालही केंद्र सरकारने उपस्थित केला आहे. त्यामुळे WHO ने दिलेल्या आकडेवारीवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे.