भारताची चीनवर मात; चंद्राभोवती भारताची तीन सक्रिय अंतराळयाने

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र संशोधन कार्यक्रमाने एक नवा टप्पा गाठला

भारताची चीनवर मात; चंद्राभोवती भारताची तीन सक्रिय अंतराळयाने

आता चंद्राभोवती भारताची तीन अंतराळयाने सक्रिय आहेत. ही संख्या चीनपेक्षा जास्त असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने जाहीर केले. चांद्रयान- ३ मोहिमेतील विक्रम लँडर गुरुवारी प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरीत्या वेगळे झाले.

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र संशोधन कार्यक्रमाने एक नवा टप्पा गाठला आहे. देशाकडे आता चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी तीन अंतराळयाने आहेत. चांद्रयान- ३ मोहिमेचे विक्रम लँडर यशस्वीरित्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले असून ते जमिनीवर उतरण्याची अपेक्षा आहे, असे इस्रोने जाहीर केले. हे लँडर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे. भारताने १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयानाचे प्रक्षेपण केले होते.

चांद्रयानात स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल, विक्रम नावाचा लँडर आणि रोव्हर यांचा समावेश आहे. मात्र आधीच्या चांद्रयानाप्रमाणे चांद्रयान-३ मध्ये ऑर्बिटरचा समावेश नाही. त्याऐवजी, त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल संदेशाच्या देवाणघेवाणीचे काम करते, लँडरचे संदेश डीकोड करते आणि ते इस्रोकडे जाते.

हे ही वाचा:

मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित

फुटिरतावादी यासिन मलिकची पत्नी पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये

दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याचा बनावट फोन

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भारतात नव्हे अफगाणिस्तानात; नऊ पत्रकारांना अटक

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावर असलेले विक्रम लँडर एका चंद्र दिवसासाठी म्हणजेच १४ पृथ्वी दिवसांच्या समतुल्य कार्यासाठी डिझाइन केले आहे. हे लँडर चंद्राच्या कक्षेत पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत आणि सॉफ्ट लँडिंग करेपर्यंत त्याची स्वतःची कार्ये पार पाडेल. या दोन अंतराळयानाव्यतिरिक्त, चांद्रयान -२चे ऑर्बिटर, चंद्राभोवती अजूनही कार्यरत आहे. दोन हजार ३७९ किलो वजनाचे आणि सौरऊर्जेद्वारा एक हजार वॉट उर्जा बनवण्याची या ऑर्बिटरची क्षमता आहे.

या तिन्ही अंतराळयानांसह, भारत अवकाश संशोधनात लक्षणीय प्रगती करत आहे. विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग झाल्यास हे इस्रोचे एक महत्त्वाचे यश असेल. भारतासह चीन, अमेरिका आणि कोरिया यांच्याही चांद्रमोहिमा सुरू आहेत.

Exit mobile version