31 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरदेश दुनियासीएनएनला भारत सरकारची कृतीतून चपराक

सीएनएनला भारत सरकारची कृतीतून चपराक

Google News Follow

Related

लसीकरणावरून भारताची खिल्ली उडवणाऱ्या परदेशी माध्यमांना भारताने कृतीतून सणसणीत चपराक लगावली आहे. अनेकांना स्वप्नवत वाटणारे असे लसीकरणाचे उद्दिष्ट भारताने अगदी सहज साद्ध्य केले आहे. भारताने ऑगस्ट महिना अखेर पर्यंत लसीचे ६० कोटी डोस देण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण भारताने हे लक्ष्य वेळे अगोदरच पूर्ण केले आहे. तर ३१ ऑगस्टच्या विक्रमी लसीकरणानंतर भारताने ६५ कोटी लसींचे डोस देऊन पूर्ण केले आहेत.

भारतात सध्या कोविड १९ विरोधातील जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. पण या मोहिमेला सुरुवात होण्याआधीच भारताने एक लक्ष्य निश्चित केले होते. ते म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत देशात ६० कोटी लसीकरण हे पूर्ण झाले असावे. अमेरिकेतील डावी वृत्तवाहिनी असलेल्या सीएनएनने याबद्दल वार्तांकन करताना भारताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात

झकास! भारताच्या मधनिर्यातीची अशीही हाफ सेंच्युरी!

मंदिरे खुली करू नका, असे केंद्राने कुठे सांगितले?

भाजपाचा गुरुवारी मुंबई महानगरपालिकेवर ‘विश्वासघात’ मोर्चा

सीएनएनने असे म्हटले होते की मोदींच्या सरकारला ऑगस्ट पर्यंत ६० कोटी लसींचे डोस द्यायचे आहेत. हे खूपच महत्वाकांक्षी आहे. खास करून भारता सारख्या विकसनशील देशासाठी जिथे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा खराब आहेत आणि नागरी आरोग्य सुविधा अपुरी आहे जी आधीच कोरोना महामारीच्या दबावामुळे दबली गेली आहे.

सीएनएनच्या याच खोडसाळपणाला मोदी सरकारने कृतीतून उत्तर दिले आहे. भारताने वेळे पूर्वी ६० कोटींचे लक्ष्य साद्ध्य करून सीएनएन सारख्या भारताला पाण्यात पाहणाऱ्या डाव्या माध्यमांना सणसणीत चपराक लगावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा