भारताकडून झिम्बाब्वे, झांबियाला तांदूळ, मक्याची मदत !

आफ्रिकेतील दुष्काळग्रस्त देशांच्या मदतीला भारत धावला

भारताकडून झिम्बाब्वे, झांबियाला तांदूळ, मक्याची मदत !

दक्षिण-पूर्व आफ्रिकन देशात अनेकदा नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे तेथील लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. सध्या देशात दुष्काळाचे सावट आहे. अन्नधान्याची दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. तेथे उपासमारीची परिस्थिती आहे. लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, जगभरात कोठेही दुष्काळजण्य परिस्थिती निर्माण झाली की भारत मदतीचा हात पुढे करतो. भारताने दुष्काळग्रस्त झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावीला मदितीचा हात पुढे करत मदत सामग्री पाठविली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी शनिवारी (७ सप्टेंबर) ही माहिती दिली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, भारताने शनिवारी (७ सप्टेंबर) झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावीला अन्न मदत पाठवली आहे. ते म्हणाले, ‘भारताने झिम्बाब्वेला मानवतावादी मदत पाठवली आहे. न्हावा शेवा बंदरातून १००० मेट्रिक टन तांदळाची खेप झिम्बाब्वेसाठी रवाना झाली आहे. यामुळे झिम्बाब्वेच्या लोकांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.

झांबियातील लोकांच्या अन्न आणि पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी भारताने १,३००  मेट्रिक टन मकाही पाठवला आहे.  प्रवक्ते जयस्वाल म्हणाले, हे आमच्या मैत्रीपूर्ण झांबिया लोकांच्या अन्न आणि पौष्टिक गरजा पूर्ण करण्यात मदत करेल.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्वीटरवर सांगितले की, अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी मलावीला १००० मेट्रिक टन तांदळाची खेप पाठवण्यात आली आहे.

हे ही वाचा :

वारीची परंपरा गढूळ करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हायलाच हवा !

जरांगेना आता भुजबळांकडून येवल्याचे निमंत्रण

चक्रव्यूह तोडता येईल का?

काँग्रेस, राष्ट्रवादीशपचा पुन्हा सांगली पॅटर्न…

दरम्यान, ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ हे या संपूर्ण घटनेला कारणीभूत आहेत. एल निनो आणि ला निना हे पॅसिफिक महासागरातील हवामानाचे नमुने आहेत, जे जगभरातील हवामानावर परिणाम करू शकतात. यापूर्वी २६ एप्रिल रोजी, टांझानियामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे कमीतकमी १५५ लोकांचा मृत्यू झाला होता.

गुरुवारी संसदेत केलेल्या भाषणात पंतप्रधान कासिम मजलिवा म्हणाले की, अल निनो हवामानाच्या पद्धतीमुळे सध्याचे हवामान खराब झाले आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वेची नासधूस झाली आहे. माजालिवा म्हणाले, ‘मुसळधार पाऊस, जोरदार वारे, पूर आणि भूस्खलनामुळे देशाच्या विविध भागांमध्ये खूप नुकसान झाले आहे.

Exit mobile version