दहशतवाद्यांना पेन्शन देण्यावरून भारताने पाकिस्तानची केली पोल खोल

दहशतवाद्यांना पेन्शन देण्यावरून भारताने पाकिस्तानची केली पोल खोल

भारताने संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवाद्यांना पेन्शन देण्यावरून पाकिस्तानला उघडे पाडले. त्याबरोबरच जगात सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना आसरा देण्यावरूनही भारताने पाकिस्तानचे वाभाडे काढले.

हे ही वाचा:

मुद्द्यांना बगल देत मुख्यमंत्र्यांची ‘आठवलेगिरी’

भारताच्या परमनन्ट मिशनचे पहिले सचिव पवन कुमार बढे यांनी सांगितले की पाकिस्तान आणि इतर ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) देशांच्या मानवाधिकार उच्चाधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीत केलेल्या वक्तव्यांच्या प्रत्युत्तराच्या अधिकारांतर्गत भारताने पाकिस्तान बाबतचा गौप्यस्फोट केला.

बढे यांनी सांगितले, की पाकिस्तानचा या परिषदेचे स्वतःच्या मानवाधिकार उल्लंघनावरून लक्ष वळवण्यासाठी गैरवापर करण्याचे धोरण कायम राहिले आहे.

पाकिस्तानने युनायटेड नेशनने घोषित केलेल्या मोठ्या प्रमाणातील दहशतवाद्यांना आसरा दिला आहे. त्याशिवाय सरकारी खर्चातून त्यांना पेन्शन देखील दिले आहे, असे भारतीय प्रतिनिधींनी सांगितले.

बढे यांनी असे देखील सांगितले, की पाकिस्तानी नेत्यांनी ही गोष्ट कबूल केली आहे की पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना झाला आहे. पाकिस्तानने दहशतवाद हे मानवाधिकाराचे सर्वात वाईट उल्लंघन आहे आणि दहशतवादाला थारा देणारे मानवाधिकाराचे सर्वात मोठे उल्लंघन कर्ते आहेत याकडे देखील दुर्लक्ष केले आहे.

यावेळी संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीय राजदुतांनी पाकिस्तानात वेगाने कमी होत असलेल्या अल्पसंख्यांक समाजाबद्दल देखील आवाज उठवला. त्याबरोबरच पाकिस्तानातील अनेक प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतीक स्थळांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत देखील त्यांनी प्रश्न विचारले. त्याबरोबरच पाकिस्तानातील बलुचिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या गायब होण्याबाबत देखील त्यांनी आवाज उठवला.

Exit mobile version