आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठे यश मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सांख्यिकी आयोगासाठी भारताची निवड झाली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवड प्रक्रियेमध्ये चीनसह इतर देशांना मागे टाकत भारताने हे यश मिळवले आहे. या तीव्र स्पर्धेतून भारताची चार वर्षांच्या कालावधीसाठी निवड झाली आहे.
या निवड प्रक्रियांमध्ये भारताला ५३ पैकी ४६ मते मिळाली आहेत. आशिया दक्षिण कोरिया पॅसिफिक प्रदेशातून दुसरा सदस्य म्हणून निवडला गेला. भारताची निवड गुप्त मतदानाने झाली, तर अर्जेंटिना, सिएरा लिओन, स्लोव्हेनिया, युक्रेन, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया आणि अमेरिका बिनविरोध निवडून आले. चार वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षी १ जानेवारीपासून सुरू होईल. भारताची युनायटेड नेशन्स कमिशन ऑन नार्कोटिक ड्रग्ज आणि यूएन प्रोग्राम ऑन एचआयव्ही/एड्स च्या समन्वय मंडळाचे सदस्य म्हणून निवड झाली आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून खडतर स्पर्धेतील या मोठ्या विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. भारताच्या सांख्यिकी, विविधता आणि लोकसंख्याशास्त्र क्षेत्रातील कौशल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगावर स्थान मिळविण्यात मदत झाली आहे असे जयशंकर यांनी म्हटले आहे. आशिया पॅसिफिक प्रदेशातील जपान आणि सामोआसह कुवेत आणि दक्षिण कोरिया सध्या सदस्य याचे आहेत. जपान आणि सामोआचा कार्यकाळ पुढील वर्षी आणि कुवेत आणि दक्षिण कोरियाचा कार्यकाळ या वर्षी संपेल.
हे ही वाचा:
कलम ३७० हटल्यानंतर जम्मू काश्मीरच्या बाहेरील १८५ लोकांनी केली जमीन खरेदी
उत्तरकाशी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली, लोकांचे घाबरून घराबाहेर पलायन
भाजप लक्ष्मणासारखे लोकांचे प्रश्न सोडवतो
हुश्श टेंशन गेलं ईएमआय वाढणार नाही.. रिझर्व्ह बँकेचा व्याज दरवाढीला ब्रेक
अधिकृत सांख्यिकी क्षेत्रातील भारताचा अनुभव, विशेषत: विविधता आणि लोकसंख्येच्या संदर्भात, खूप मोठा आहे आणि सांख्यिकी आयोगाच्या कामकाजात एक मौल्यवान भर पडेल. होईल असे संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या स्थायी मिशनने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.