आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी भारत!

आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी भारत!

आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी भारताची एकमताने निवड झाली आहे. २०२२ ते २०२४ या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे. फिलिपिन्स मधील मनिला येथे ७ मे २०२२ रोजी कार्यकारी मंडळ आणि सर्वसाधारण सभेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. मनिला निवडणूक आयोग सध्या एएईएचे अध्यक्ष होते. पण त्या जागी आता भारताची निवड झाली आहे. तर कार्यकारी मंडळातील नवीन सदस्यांमध्ये आता रशिया, उझबेकिस्तान, श्रीलंका, मालदीव, तैवान आणि फिलीपिन्स यांचा समावेश आहे.

भारतीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त नितेश व्यास यांच्या नेतृत्वाखालील ३ सदस्यीय शिष्टमंडळ मनिला इथे कार्यकारी मंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. यात मणिपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश अग्रवाल आणि राजस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गुप्ता यांचाही समावेश होता. शिष्टमंडळाने २०२२-२३ साठी कामाचा आराखडा, तसेच २०२३-२४ साठी भविष्यातील उपक्रमांचे कार्यकारी मंडळाला सादरीकरण केले.

हे ही वाचा:

राणा दाम्पत्याची पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा

राजद्रोहाच्या सर्व खटल्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!

बसपा नेत्याने अपहरण करून विकल्याचा विद्यार्थीनीचा आरोप

एलॉन मस्क यांनी केली ही मोठी घोषणा

फिलीपिन्समधील मनिला येथे १९९७ साली जानेवारी महिन्यात २६-२९ या कालावधीत आयोजित, एकविसाव्या शतकातील आशियाई निवडणुकांवरील परिसंवादातील सहभागींनी संमत केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने, आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेची (एएईए) स्थापना १९९८ साली करण्यात आली. सध्या २० आशियाई ईएमबी, एएईएचे सदस्य आहेत. भारतीय निवडणूक आयोग, एएईएचा संस्थापक सदस्य ईएमबी आहे. तर या आधी २०११-१३ या कालावधीत एएईएच्या कार्यकारी मंडळावर उपाध्यक्ष आणि २०१४-१६ मध्ये अध्यक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने काम केले आहे.

Exit mobile version