‘भारताने जी २० अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही’

संयुक्त घोषणा पत्रात रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची स्पष्टोक्ती

‘भारताने जी २० अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही’

भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली जी २० शिखर परिषद यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र रशियाने दिले आहे. जी २० शिखर परिषद संपूर्णपणे युक्रेन युद्धावर केंद्रित केली न गेल्याने रशियाने भारताचे कौतुक केले आहे. भारताने जी २० शिखर परिषदेतील अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी भारताप्रति भावना व्यक्त केल्या.

जी २० शिखर परिषदेचे राजकियीकरण करण्याच्या प्रयत्नांना रोखल्याबद्दल रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे आभार मानले आहेत. ही शिखर परिषद निश्चितपणे यशस्वी झाली, असे ते म्हणाले. जी २० नेत्यांनी शिखर परिषदेतील जाहीरनाम्यावर एकमताने मंजुरी दिल्याबद्दलही लावारोव यांनी कौतुक केले. ‘जेव्हा त्यांनी याबाबत सहमती दर्शवली, तेव्हा कदाचित तोच त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज होता. खरे सांगायचे तर, आम्हालाही याची आशा वाटत नव्हती,’ असे लावारोव्ह म्हणाले.

हे ही वाचा:

जोकोव्हिचची विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या !

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

‘चिंतामणी’च्या मिरवणुकीत चोरट्यांचा जल्लोष

या वर्षी जी २० शिखर परिषदेची मुख्य घोषणा ग्लोबल साऊथच्या एकिकरणाची होती. जी २० आपले लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्यक्षात काम करत आहे, अशी प्रतिक्रिया लावारोव्ह यांनी दिली. ‘दिल्लीचा जाहीरनामा चांगल्या उद्दिष्टांपैकी एक आहे आणि आम्ही पहिल्यापासून त्याच मार्गावर आहोत. या सकारात्मक परिणामांच्या मार्गावरूनच आम्ही चालत राहू. पुढील वर्षी ब्राझीलच्या आणि सन २०२५मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी २० शिखर परिषदेतही आम्ही याच मार्गावरून चालून ही भूमिका आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करू’ असा विश्वास लावारोव्ह यांनी व्यक्त केला.

Exit mobile version