चीनशी सामना करायला आता ‘पिनाका’ तैनात

चीनशी सामना करायला आता ‘पिनाका’ तैनात

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) उद्भवणाऱ्या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने चीन सीमेजवळील फॉरवर्ड पोजीशनवर पिनाका आणि स्मर्क ​​मल्टीपल रॉकेट लॉन्चर सिस्टीम्स (एमआरएलएस) तैनात केल्या आहेत.

पिनाका शस्त्रास्त्र प्रणाली ही एक स्वायत्त रॉकेट तोफखाना यंत्रणा आहे, जी समुद्रसपाटीपासून ३८ किमी पर्यंतच्या क्षेत्रातील लक्ष्यांना भेदू शकते. या उंचीवर, लक्ष्याला भेदण्याची क्षमता वाढवली जाते. ज्यामुळे शस्त्र प्रणालीची शत्रूच्या भागात खोलवर मारा करण्याची क्षमता अजून वाढते.

पिनाकाच्या सहा लाँचर्सची बॅटरी ४४ सेकंदात ७२ रॉकेट्सचा गोळीबार करू शकते ज्यामुळे १००० मीटरचे क्षेत्र ८०० मीटरने तटस्थ होते.

शस्त्र प्रणालींबद्दल बोलताना, बॅटरी कमांडर लेफ्टनंट कर्नल सारथ यांनी एएनआयला सांगितले की, “पिनाका शस्त्र प्रणाली ही स्वदेशी मल्टी रॉकेट लाँचर प्रणाली आहे जी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने बनवली आहे. हे प्रणाली अत्याधुनिक, पूर्णपणे स्वायत्त शस्त्र आहे. ही प्रणाली, जी समुद्रसपाटीवर आणि उच्च उंचीवर ३८ किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्यांना सामील करू शकते, त्यानंतर याच्या रेंजमध्ये लक्षणीय वाढ होते.

हे ही वाचा:

भारतही हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे

अखिलेश यादव आणि तुकडे तुकडे गॅंगची हातमिळवणी

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोविड केसेस पुन्हा वाढल्या

करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग

भारताच्या लष्करी शक्तीला पिनाका आणि स्मर्कच्या फायद्यांविषयी बोलताना ते म्हणाले, “ही प्रणाली अत्यंत कमी वेळात शत्रूवर मारा करण्याची क्षमता देते. त्याचबरोबर या शस्त्र प्रणालींची उच्च अचूकता शत्रूच्या गंभीर आणि संवेदनशील लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता वाढवते.”

स्मर्क प्रणाली ही भारतीय लष्कराच्या यादीतील सर्वात लांब पल्ल्याची पारंपारिक रॉकेट प्रणाली आहे. ज्याची जास्तीत जास्त मारक क्षमता ९० किमी आहे. चार लाँचर्सची बॅटरी ४० सेकंदात ४८ रॉकेटच्या फैरी धाडू शकते.

Exit mobile version