25 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरदेश दुनिया“नेहरूंमुळे भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनता आले नाही”

“नेहरूंमुळे भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनता आले नाही”

एस जयशंकर यांचा पंडित नेहरू आणि काँग्रेसवर घाणाघात

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांना जोर आला असून सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. सर्वच पक्षातील मोठमोठे नेते प्रचाराला लागले आहेत. अशातच आता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी विरोधकांवर टीका करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर आणि त्यांच्या धोरणावर निशाणा साधला आहे. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात आयोजीत एका रॅलीत त्यांनी टीका केली. नेहरूंमुळेच भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) स्थायी सदस्य बनता आले नाही. भारताऐवजी चीनला ही संधी मिळाली, असे एस जयशंकर म्हणाले. तसेच, दहशतवादावरूनही एस जयशंकर यांनी आधीच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.

संयु्क्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषेदत भारताला कायमस्वरुपी सदस्य म्हणून चालून आलेली संधी नेहरुंमुळे भारताने गमाविल्याचा आरोप जयशंकर यांनी केला. त्यामुळे चीनला ही संधी मिळाली. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य व्हावा, अशी नेहरुंची इच्छा नव्हती. त्यांनी भारताऐवजी चीनला प्राधान्य दिले, अशी तिखट टीका जयशंकर यांनी केली.

भारत सीमेपलीकडून येणारा दहशतवाद अजिबात सहन करणार नाही, असा इशारा एस. जयशंकर यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरक्षेची सर्व आव्हानं पेलल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वी 2008 मध्ये भारतावर दहशतवादी हल्ला झाला. मुंबई हादरली. आजच्या भारतात सीमेपलीकडून कोणतीही दहशतवादी घटना घडली तर आम्ही उरीसारखी प्रतिक्रिया देतो, असे एस जयशंकर यांनी सांगितले. सीमावर्ती भागातील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक नागरिकाला त्याचे महत्त्व माहीत आहे, असं जयशंकर म्हणाले.

हे ही वाचा:

आचारसंहितेदरम्यान पुणे, नागपूरमधून लाखोंची रोख रक्कम जप्त

इंडी आघाडीवाल्यांची ताकद वाढली तर देशाचे तुकडे-तुकडे करतील!

ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही

परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला

एस जयशंकर म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत मोठा बदल झाला आहे. आज देश मजबूत हातात असल्याचे ते म्हणाले. योग्य निर्णयामुळे योग्य दिशेने देश जात आहे. कोणताही निर्णय घेताना आम्ही पूर्णपणे निश्चिंत असतो, कारण आम्हाला आमच्या पाठिशी शक्ती असल्याचे माहित असल्याचा दावा त्यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा