भारताने व्यक्त केली म्यानमारमधल्या सैनिकी उठावाबद्दल चिंता

भारताने व्यक्त केली म्यानमारमधल्या सैनिकी उठावाबद्दल चिंता

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमध्ये झालेल्या लष्कराच्या बंडा बद्दल चिंता व्यक्त केली आहे.

“आम्ही म्यानमारमधील घडामोडींंबद्दल चिंता व्यक्त करतो.” असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

“कायदा आणि सुव्यवस्था लोकशाही मार्गाने राखली गेली पाहिजे यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्ही परिस्थितीचे सुक्ष्म अवलोकन करत आहोत.”

म्यानमारच्या सैन्याने बंड पुकारले आहे. सैन्याने तेथील लोकशाही मार्गने निवडून आलेल्या आंग सान सु क्यी यांना बंदी बनवण्यात आले आहे. आंग सु क्यी ह्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या सोबत म्यानमारच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या इतर अनेक नेत्यांना देखील अटकेत टाकण्यात आले आहे. या सरकारच्या निवडून येण्यापूर्वी या देशात लष्करी हुकूमशाही होती.

भारताने ईशान्य राज्यांतील सशस्त्र बंडखोरांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी म्यानमारची मदत घेतली होती. त्याबरोबरच या दोन्ही देशातील सहकार्य कोविड-१९च्या महामाहीच्या वेळेसही दिसून आले आहे. भारताने शेजारधर्म दाखवत भारतीय बनावटीची कोविशिल्ड ही लस म्यानमारला देखील दिली आहे. त्यामुळे भारताच्या शेजारील देशांत होणाऱ्या घटनांवर सध्याचा भारत बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच या अशांततेबद्दल भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

Exit mobile version