चीनच्या माघारीच्या पुढच्या टप्प्याची चर्चा

चीनच्या माघारीच्या पुढच्या टप्प्याची चर्चा

भारत आणि चीन सैन्यदलातील उच्च पदस्थांच्या चर्चेची १०वी फेरी पार पडली. सुमारे १६ तास चाललेल्या या बैठकीत चीन आणि भारताने आपले सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेची चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा:

उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी ओवैसींची तयारी

दोन्ही पक्षांच्या कोर- कमांडरची बैठक सकाळी १० वाजता चालू झाली ती पहाटे २ वाजेपर्यंत चालली.

चीन आणि भारत यांच्यातील सैन्यदलाच्या बैठकीची १०वी फेरी लडाखच्या पँगाँग त्सो या लडाखच्या तणावपूर्ण भागातील तणाव निवळण्याकरता पार पडली. त्याबरोबरच या बैठकीत पीएलएसोबतच्या डेपसांग, हॉट स्प्रिंग आणि गोग्रा या भागातील सैन्याच्या माघारीवर चर्चा करण्यात आली.

यापूर्वीच्या ९ व्या फेरीत चीनच्या पीएलएने फिंगर ८च्या पूर्वेला आपले सैन्य नेऊन ठेवावे, तर भारताने आपले सैन्य फिंगर ३ च्या जवळ ठेवावे असे ठरले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत माहिती देताना हे देखील सांगितले, की दोन्ही सैन्याने पँगाँग तलावाच्या किनारी पेट्रोलिंग करू नये असे देखील ठरले आहे.

दोन्ही बाजूंनी तणाव गेल्या मे महिन्यापासून वाढत गेला आहे. दोन्ही बाजूंनी ५० हजार सैन्य तैनात करण्यात आले होते. त्याशिवाय अत्याधुनिक शस्त्रे देखिल तैनात करण्यात आली होती. चीनी सैन्याच्या घुसखोरीमुळे भारतीय सैन्याला काही भागात गस्त घालणे अवघड होऊ लागले होते.

या आठवड्याच्या सुरूवातीला चीनने गलावन खोऱ्यात भारतीय सैन्याशी झालेल्या हातापायीत चार सैनिक गमावल्याची कबूली दिली होती.

Exit mobile version