22 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरदेश दुनियाभारत-कॅनडामधील संबंध ताणले

भारत-कॅनडामधील संबंध ताणले

दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करारासंदर्भातील चर्चा स्थगित

Google News Follow

Related

सध्याच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा यांच्यामधील मुक्त व्यापार करारासंदर्भातील चर्चा तूर्त स्थगित करण्यात आली आहे. कॅनडाच्या व्यापार मंत्री मेरी एनजी यांनी ऑक्टोबरमध्ये भारतासोबत होणारी व्यापार मोहीम स्थगित केली आहे, असे मेरी यांच्या प्रवक्त्या शांती कोसेन्टिनो यांनी नमूद केले आहे.

राजनैतिक मुद्द्यांवर तोडगा निघाल्यास पुन्हा व्यापाराच्या मुद्द्यांवरील चर्चा सुरू होईल, असा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे. परंतु हा राजनैतिक मुद्दा हा खलिस्तानी कारवायांचा आहे का, याबाबत अधिक स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. नुकतीच कॅनडाने दोन्ही देशांमधील चर्चा स्थगित करण्याचे जाहीर केले होते. ‘भारताने कॅनडातील काही ठराविक राजनैतिक घटनांबाबत तीव्र नाराजी दर्शवली होती. त्यामुळे राजनैतिक मुद्द्यांवर तोडगा निघेपर्यंत आम्ही चर्चा स्थगित केली आहे. जेव्हा या राजनैतिक मुद्द्यांवर तोडगा निघेल, तेव्हा पुन्हा चर्चा सुरू होईल. तूर्त ही केवळ स्थगिती आहे,’ असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

या संदर्भात शुक्रवारीच भारतातर्फे कॅनडाला इशारा देण्यात आला होता. ‘जोपर्यंत कॅनडा भारतविरोधी कारवायांना रोखत नाही, तोपर्यंत या देशाशी मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा केली जाणार नाही,’ असा इशारा भारताने दिला होता. दोन्ही देशांमध्ये सुमारे १० वर्षानंतर थेट व्यापार करारासंदर्भात चर्चा होणार होती. मात्र भारताने असा इशारा दिल्याने कॅनडाने पुढील महिन्यात होणाऱ्या व्यापार मोहिमेतून माघार घेतली आहे.

मे महिन्यात व्यापार मंत्री मेरी आणि भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी संयुक्त निवेदन जाहीर करून या वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्या कार्यकाळात खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडातील भारतीय वंशाच्या नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या होत्या. याबद्दल भारताने सातत्याने चिंता व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशातले गोई हे वटवाघळांचे गाव

सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, सेंड अँड्र्यूज कॉलेजला जेतेपद

के. सी. कॉलेज खेलो इंडिया बास्केटबॉल स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये

गिल खेळला, पण पराभव झाला!

भारताने आर्थिक वर्ष २०२३मध्ये कॅनडाला ४.११ अब्ज डॉलरची निर्यात केली असून आर्थिक वर्ष २०२२मध्ये हीच निर्यात ३.७६ अब्ज डॉलर होती. कॅनडातून होणाऱ्या आयातीमध्ये २९.३ टक्के वाढ होऊन ती ४.०५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा