संयुक्त राष्ट्रांनी सादर केलेल्या एका अहवालात भारतातील गरिबी मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ४१.५ कोटी लोक हे गरिबीच्या रेषेतून वर आले आहेत. भारताने ही कामगिरी केवळ १५ वर्षांत केली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. २००५-०६ ते २०१९-२१ या कालावधीत भारताने गरिबीची रेषा ओलांडली आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाने केलेल्या या कामगिरीचे संयुक्त राष्ट्रांनी कौतुक केले आहे.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत जागतिक गरिबी निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. शिवाय, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑक्सफर्ड गरिबी आणि मानव विकास उपक्रमाच्या अंतर्गत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतासह जगातील २५ देशांनी गरिबीतून बाहेर येण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यात भारतासह कंबोडिया, चीन, काँगो, होन्डुरास, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया, व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
तुडवावा चिखल, उडवावा चिखल, फासावा चिखल चोहीकडे….
२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना
उत्तर भारतातील धुवाँधार पाऊस हा हवामान बदलाचा परिणाम नव्हे!
बृजभूषण सिंह यांच्याविरोधात खटला चालवला जाऊ शकतो!
भारताखालोखाल चीन (६.९ कोटी), इंडोनेशिया (८० लाख) इतके लोक गरिबी रेषेतून वर आली आहेत. एप्रिल महिन्यात भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून नाव नोंदविले आहे. भारताची लोकसंख्या आता १अब्ज ४२ कोटी ८६ लाख इतकी आहे.
या अहवालात म्हटले आहे की, २००५-०६मध्ये भारतातील ६४.५ कोटी जनता ही गरिबी रेषेखाली होती. २०१५-१६मध्ये ही संख्या ३७ कोटींपर्यंत आली. २०१९-२१ मध्ये ती घसरून २३ कोटी झाली. पोषणाच्या बाबतीत पाहायचे झाले तर २००५-०६मध्ये भारतातील ४४.३ टक्के लोक कुपोषित होते पण २०१९-२१ मध्ये ही संख्या ११.८ टक्के इतकी खाली आली. बालमृत्यूचे प्रमाणही ४.५ टक्क्यांहून १.५ टक्क्यांवर आले. पिण्याच्या पाण्यासंदर्भात जाहीर झालेल्या निर्देशांकातही घट झाली असून २००५-०६मध्ये हे प्रमाण १६.४ टक्के होते ते २०१९-२१मध्ये २.७ टक्के झाले आहे.