भारत- भूतानमध्ये व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ क्षेत्रातले सामंजस्य करार

नरेंद्र मोदी यांचा भूतान दौरा

भारत- भूतानमध्ये व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ क्षेत्रातले सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार, २२ मार्च रोजी भूतान दौऱ्यावर गेले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी थिम्पू येथे भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची भेट घेतली. आयोजित औपचारिक भोजनाच्या वेळी त्यांनी संवादही साधला.

पारो ते थिंपू या संपूर्ण प्रवासात भूतानवासीयांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या अभूतपूर्व स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोबगे यांचे आभार मानले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी बहुआयामी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तसेच नवीकरणीय ऊर्जा, कृषी, युवा देवाणघेवाण, पर्यावरण आणि वनीकरण तसेच पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात चर्चा झाली.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

कर्णधार ऋतुराजची विजयी सलामी

इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांचा मॉस्कोमध्ये हल्ला; १४० जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!

भारत आणि भूतानमध्ये दीर्घ काळापासून सर्व स्तरांवर अत्यंत विश्वासाचे, सद्भावनेचे आणि परस्पर सामंजस्याचे वैशिष्ट्यपूर्ण संबंध आहेत. बैठकीपूर्वी दोन देशांत ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ, कृषी अशा विविध क्षेत्रातले अनेक सामंजस्य करार दोन्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिम्पू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. पारो ते थिंपू या संपूर्ण प्रवासात लोकांनी पंतप्रधानांचे स्वागत केले ,भूतानच्या लोकांकडून झालेल्या या अनोख्या स्वागताबद्दल पंतप्रधानांनी राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे आभार मानले.

Exit mobile version