विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये स्कॉटलंडचा धुव्वा उडवला आहे. आठ विकेट राखून विराटसेनेने स्कॉटलंडवर मात केली आहे. विशेष म्हणजे स्कॉटलंडने भारतीय संघासमोर ठेवलेले आव्हान भारतीय खेळाडूंनी अगदी लीलया पार केले. त्यामुळे स्पर्धेतील भारताची धावगती वाढली असून भारतीय संघ अफगाणिस्तानच्या पुढे गेला आहे.
शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध स्कॉटलंड हा सामना रंगला होता. आयसीसी टी-२० पुरुष विश्वचषकाच्या सुपर बारा फेरीतील भारताचा चौथा सामना होता. भारत या सामन्यात विजेता ठरणार याचे भाकीत आधिच करण्यात आले होते. पण भारताने हे लक्ष्य साध्य करताना रन रेट उंचावण्याच्या दृष्टीने महत्वाची कामगिरी केली.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा भारतीय गोलंदाजांनी किती योग्य होता हे आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले. भारतीय संघाकडून खेळताना रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी तीन विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन आणि एक असे गडी बाद केले.
हे ही वाचा:
आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे
उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा
चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?
भारताच्या भेदक गोलंदाजी पुढे स्कॉटलंड संघाचा निभाव लागला नाही धावफलकावर ते केवळ ८६ धावा चढू शकल्या. तर भारतीय संघाने अवघ्या सहा षटकांमध्ये हे आव्हान साध्य केले. फलंदाजीत सलामीवीर रोहित शर्मा आणि के.एल राहुल यांनी चमकदार कामगिरि केली. राहुलने केवळ १९ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. त्यामुळे भारताचे या विश्वचषकातील आव्हान अद्याप तरी संपूष्टात आलेले नाही