भारत- बांग्लादेशने छेडला ‘मैत्री’ राग

भारत- बांग्लादेशने छेडला ‘मैत्री’ राग

बांग्लादेश मुक्तीच्या ५० वर्षांच्या पूर्ततेच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. या भेटी दरम्यान बांग्लादेशचे राष्ट्रपिता आणि पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान यांच्या १०० वर्षांच्या निमित्ताने नवा राग सादर करण्यात आला. सुप्रसिद्ध गायक अजय चक्रबर्ती यांनी हा राग सादर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसिना यांच्या समोर हा राग सादर करण्यात आला. ‘बंगबंधू’ यांच्या जन्मशताब्दी निमित्त आणि भारत- बांग्लादेश मैत्री निमित्त, श्री अजय चक्रबर्ती यांनी ‘मैत्री’ याच नावाच्या रागाची निर्मीती केली. हा कार्यक्रम नॅशनल परेड ग्राऊंडवर पार पडला. या बाबत परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ट्वीट केले होते.

हे ही वाचा:

नवाब मलिक, रिपोर्ट फोडला तर फोडला म्हणा, घाबरता कशाला?

बांग्लादेशमधील हिंदू भाविकांना मोदी सरकारची अनोखी भेट

सीएएसाठी भाषण करणारे मनमोहन आता त्याचा विरोध करतात; हाच काँग्रेसचा खरा चेहरा

या रागातून हिंदी, संस्कृत आणि बंगाली भाषेतील रचना सादर करण्यात आल्या. संस्कृतमधील रचना डॉ. अरिंदम चक्रबर्ती यांनी केली होती, तर संस्कृत मधील रचना सुस्मिता बसु मजुमदार यांनी केली होती. बंगाली मधील रचना पंडित अजय चक्रबर्ती यांचे शिष्य अनल चॅटर्जी यांनी केली होती. या तिनही रागांतील रचनांना संगित अजय चक्रबर्ती यांनी दिले होते.

या नवीन रागाची रचना ‘राग अभोगी’ आणि ‘राग हेमंत’ या दोन रागांवर आधारित आहे. राग हेमंतची रचना विख्यात गायक उस्ताद अल्लाऊद्दीन खान यांनी केली होती असे पंडित अजय चक्रबर्ती यांनी सांगितले. पंडित अजय चक्रबर्ती यांचे वडिल मूळचे बांग्लादेशातील होते. फाळणीच्या वेळी ते बांग्लादेशातील आपले घर सोडून कोलकाता येथे स्थायिक झाले.

Exit mobile version