दिवसेंदिवस वाढणारी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार महत्वाचे निर्णय घेत आहे. आधी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यांनतर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच सरकारने साखरेच्या निर्यातीवर काही निर्बंध लावत निर्यातबंदी केली आहे. त्याशिवाय अजून एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आपण जे सोयाबीन आणि सूर्यफूलाचे तेल आयात करतो, ते आता इम्पोर्ट ड्युटी फ्री म्हणजे आयात करमुक्त केले आहे.
केंद्र सरकारने १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सहा वर्षानंतर पहिल्यांदाच अशी साखरेच्या निर्यातीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे आता सारखरेच्या किंमती कमी होतील असं म्हटलं जातंय. या वर्षी देशात साखरेचे अधिक उत्पादन झालेलं. पण तरीही देशात साखरेचे दर वाढत होते. कारण याआधी कधीच एवढी निर्यात झाली नाही तेवढी यावर्षी भारताने साखरेची निर्यात केली आहे. कारण संपूर्ण जगात फक्त ब्राझील असा देश आहे, जो भारतापेक्षा जास्त साखर निर्यात करतो. पण यावर्षी ब्राझीलचे साखरेचे उत्पादन जास्त झाले नाही आणि निर्णयाचा संपूर्ण भार भारतावर आला. या वर्षीच्या टार्गेटपेक्षा जास्त भारताने साखर निर्यात केलीय.
\२०२१ – २२ या वर्षी भारताचं ६० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचा टार्गेट होत मात्र यावर्षी भारताने जास्तीची १० लाख मेट्रिक टन साखर निर्यात केलीय. २०२१- २२ या वर्षात भारताने ७० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करून एक इतिहास रचलाय कारण याआधी भारताने कधीच एवढी साखर निर्यात केली नव्हती. मात्र भारतात साखरेची मागणी वाढतेय आणि याचा परिणाम आपल्या पुरवठ्यावर होतोय. म्हणून सरकारने १ जून पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातलीय. जेणेकरून सरकारला किमान २ ते ३ महिने साखरेचा साठा देशासाठी ठेवता येईल आणि देशाची वाढती साखरेची मागणी पूर्ण होईल. या कालावधीत जर व्यापाऱ्यांना साखर निर्यात करायची असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. मात्र या साखरेच्या निर्यातीमध्ये काही अपवाद आहे. युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत आपला पहिल्यापासूनच करार आहे त्यामुळे त्या देशांना कमीतकमी साखर निर्यात करावी लागणार आहे.
भारताकडून इंडोनेशिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, दुबई, चीन आणि आफ्रिका हे देश प्रामुख्याने साखर आयात करतात. त्यामुळे आपण साखरेवर निर्यातबंदी केल्याने या देशांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या साखरेचा घाऊक बाजारात भाव तीन ते साडेतीन हजार प्रति क्विंटल आहे. देशातील महाराष्ट्र,कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक साखरेचं उत्पादन केलं जात. आपल्या देशात होणाऱ्या उत्पादनापैकी अर्ध्याहून जास्त टक्के उत्पादन या तीन राज्यातून केलं जात.केंद्र सरकारने देशातील जनतेच्या मागणीला प्राध्यान्य देत साखर निर्यातीवर बंदी घातलीय.
अजून एक साखर निर्यातीचं महत्वाचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच केंद्राने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या देशात इथेनॉलच उत्पादन करण्यासाठी ऊस हा प्रमुख घटक आहे. त्यामुळे इथेनॉलच उत्पादन वाढावं आणि त्यासाठी उसाचा जास्तीत जास्त वापर करता यावा म्हणून सुद्धा साखर निर्यातीवर बंदी घातलीय.
हे ही वाचा:
पंजाबचे गायक सिद्धू मूसवाला याची हत्या
देहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी
‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा
काही दिवसांपूर्वीच भारतने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातलेली. कारण रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धानंतर जगभरात गव्हाची टंचाई निर्माण झाली होती, आणि रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश जवळपास जगात २५ टक्के गव्हाची निर्यात करतात. मात्र हे दोन्ही देश युद्धात अडकले त्यामुळे भारताकडे गव्हाची मागणी वाढू लागली.अधिक निर्यातीमुळे भारतातील गव्हाचे भावही वाढू लागले. त्यामुळे शेवटी गेल्या आठवड्यात सरकारने गव्हाच्या वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली. सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून एक निर्णय घेतलाय. आपण हे आयात करतो त्यावर आयात कर लागतो. मात्र आता तेल आयातीमध्ये दोन मिलियन मेट्रिक टनापर्यंत दोन वर्षासाठी आयात कर लागणार नाहीय. याआधी सुद्धा तेलावरील आयात कर सरकारने कमी केला होता, आणि आता फक्त पाच टक्केच आयात कर होता. तो सुद्धा आता काढून टाकला आहे.