‘तेल उत्पादन वाढवा’ भारताची ओपेक प्लस देशांना विनंती

‘तेल उत्पादन वाढवा’ भारताची ओपेक प्लस देशांना विनंती

खनिज तेलाचा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार आणि उपभोक्त्या भारताने ओपेक प्लस देशांना खनिज तेलाच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी उत्पादन वाढवण्याची विनंती केली आहे, असे भारताचे तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘भ्रष्टाचाराचा कोविड’ वरून भाजपा आक्रमक

‘सीइआरए वीक’ येथे बोलताना प्रधान यांनी सांगितले, की भारतात तेलाचा वापर आता पुन्हा एकदा महामारीपूर्व स्तरावर येत आहे. त्यामुळे भारताला, वाजवी आणि विश्वासू दरातील तेल पुरवठ्यावर विसंबून राहणे आवश्यक आहे.

मागील वर्षी महामारीमुळे तेलाचे भाव गडगडले होते. ओपेक प्लस देशांनी त्यांचे उत्पादन घटवल्याने तेलाचे भाव सावरण्यास मदत होत आहे.

ओपेक प्लस देश उत्पादन वाढवणार नाहीत अशा अपेक्षेने तेलाच्या दरात २ टक्क्यांची वाढ झाली होती. तेलाचे वाढते भाव भारतासाठी चिंतेचा विषय झाला आहे. प्रधान यांनी सांगितले, मागिल वर्षी तेलाच्या मागणीत एकदम घट झाल्याने भारताने ओपेक प्लस देशांच्या उत्पादन घटवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यावेळेला विशेषतः ओपेकने २०२१ मध्ये मागणी पूर्वपदावर आली की उत्पादन देखील हळूहळू वाढवण्यात येईल असा शब्द दिला होता. परंतु मला सांगायला खेद वाटतो, की अजूनही उत्पादन पूर्वस्तरावर आणण्यात आलेले नाही.

त्यांनी असे देखील सांगितले, की आमच्या काही मित्रांना तेलाच्या अधिक किंमतींमुळे कदाचित फायदा होईल परंतु भारतासारख्या उभरत्या देशांना वाजवी दरातील तेलाची गरज आहे.

भारत तेलाच्या एकूण गरजेपैकी ८४ टक्के तेल आयात करतो, त्यापैकी ६० टक्के तेल मध्य पूर्वेतून आयात केले जाते. जर तेलाच्या किंमती अशाच वाढत राहिल्या तर भारत पर्यायी इंधनांचा विचार करेल असे सांगितले आहे.

Exit mobile version