भारत आणि वेस्ट इंडिज या दोन तगड्या संघांमध्ये क्रिकेट मालिका होऊ घातली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही मालिका सुरु होणार असून वन डे आणि टी २० मालिका खेळली जाणार आहे. या दोन्ही मालिकेत प्रत्येकी तीन तीन सामने खेळले जाणार आहेत. या मालीकेसाठी दोन्ही देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. त्यामुळे आता नेमके कोण सरस ठरणार याची चर्चा रंगताना दिसत आहे.
भारतीय संघ आत्ता नुकताच दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सडकून मार खाऊन परतला आहे. भारताने कसोटी मालिका तर गमावलीच पण एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला एकही सामना जिंकता आला नाही. या पराभवातून पुन्हा सावरण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि नवा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा परतणार आहे. रोहित शर्मा हा दुखापतीतून बारा होऊन आपले पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन्ही मालिकांमध्ये रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानावर उतारणार आहे.
या मालिकेत कुलदीप यादव याचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. तर दीपक हुडा आणि रवी बिष्णोई यांना भारतीय संघात संधी मिळाली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आला असून भुवनेश्वर कुमार याला डच्चू देण्यात आला आहे.
असा असणार वन-डे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सीराज, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.
टी-२० संघ अशाप्रकारे असेल
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सीराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये घरबसल्या मिळते AK- 47
समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन
प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार
राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे
या सोबतच वेस्ट इंडिजनेही भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात एकूण १५ खेळाडूंचा समावेश असून कायरन पोलार्डच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजचा संघ मैदानात उतरणार आहे.
वेस्ट इंडीजचा संघ
कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऐलन, एनक्रुमाह बोनर, डेरेन ब्रावो, शामराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शे होप, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, कीमार रोच, रोमारिया शेफरड, ओडियन स्मिथ आणि हेल्डन वॉल्श जूनियर