काय आहे भारत-रशिया दरम्यानचा इंद्र-२१ युद्ध सराव?

काय आहे भारत-रशिया दरम्यानचा इंद्र-२१ युद्ध सराव?

भारत आणि रशिया या दोन्ही देशांची सैन्य एकत्र युद्ध सराव करणार आहेत. इंद्र-२१ या दोन्ही देशांच्या सैन्य सराव कार्यक्रमाच्या अंतर्गत हा सराव पार पडणार आहे. भारत आणि रशिया यांच्या दरम्यानचा हा बारावा सराव आहे. रशियामध्ये व्होल्गोग्राड या शहरात हा सराव पार पडणार आहे. पुढल्या माहिन्यात १ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट रोजी हा सराव होणार आहे.

या युद्धाभ्यासात दोन्ही देशांचे २५० जवान सहभागी होणार आहेत. या संयुक्त सरवामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांच्या कारवाया रोखण्यासाठी, तसेच दहशतवादविरोधी मोहिमांच्या परिचालनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नियमावलीनुसार संयुक्तपणे काम करण्याचा सराव दोन्ही देशांच्या सैन्य तुकड्यांमध्ये केला जाईल.

हे ही वाचा:

बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त

…म्हणून गुजरातमधील शहराला मिळाला ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ चा दर्जा

मदत घेऊन निघाले भाजप युवा मोर्चाचे ट्रक…

वर्ल्ड हेरिटेज साईट ठरलेल्या भारतातील मंदिराची काय आहे खासियत?

या संयुक्त सरावामध्ये सहभागी होण्यापूर्वी, जवानांची युध्दकौशल्ये अधिक सफाईदार व्हावीत या उद्देशाने, सरावात भाग घेणाऱ्या भारतीय लष्कराच्या पायदळातील यांत्रिकी विभागाच्या तुकडीचे देशातील विशेष असे प्रशिक्षण घेण्यात आले. देशभरातील विविध ठिकाणी अत्यंत कठोर असे स्वरूपाचे हे प्रशिक्षण पार पडले.

इंद्र २१ या युद्ध सरावामुळे भारत आणि रशिया या देशांच्या लष्करांमध्ये परस्परांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. तर त्यासोबतच दोन्ही देशांतील आकस्मिक गरजेच्या वेळी या देशांच्या लष्करांमध्ये अधिक उत्तम सुसंवाद राखणे शक्य होणार आहे. तसेच हा युद्ध सराव, भारत आणि रशिया या देशांदरम्यानचे संरक्षणविषयक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या मैत्रीच्या दीर्घकालीन नात्याला पुन्हा नवी चालना मिळणार आहे.

Exit mobile version