गिफ्ट सिटी भारताचा सन्मान, जगाची शान!

गिफ्ट सिटी भारताचा सन्मान, जगाची शान!

Shri Sudhir Mankad, Chairman, GIFT City, presenting key of GIFT City to the Prime Minister, Shri Narendra Modi, at the inauguration ceremony of the India International Exchange in GIFT City, Gandhinagar, Gujarat on January 09, 2017. The Minister of State for Finance and Corporate Affairs, Shri Arjun Ram Meghwal is also seen.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुक्रवारी गांधीनगरजवळील इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) येथे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय (गोल्ड स्पॉट एक्सचेंज) बुलियन एक्स्चेंजचे उदघाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणीही यावेळी पंतप्रधानांनी केली.

गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्याचा दावा करत आहे, असे ते म्हणाले. भारत जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि आपल्या वर्तमान आणि भविष्यातील भूमिका पूर्ण करू शकतील अशा संस्था तयार केल्या पाहिजेत, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,  जागतिक वित्तीय क्षेत्रातील नवीन दिशा देणाऱ्या अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूर सारख्या देशांच्या पंक्तीत आता भारत आला आहे. आज भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थ व्यवस्थांपैकी एक आहे. भविष्यात आपली अर्थव्यवस्था यापेक्षाही मोठी होईल आणि त्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. त्यासाठी अशा संस्थांची गरज आहे ज्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपली आजची आणि भविष्यातील भूमिका पार पाडू शकेल.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत किशनराव कराड या कार्यक्रमांना उपस्थित होते.

सेवा क्षेत्रात जागतिक स्तरावर दमदार पाऊल टाकत वाटचाल

२००८ मध्ये जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि मंदीचा काळा होता. भारतात धोरण लकव्याचे वातावरण होते. परंतु त्याचवेळी गुजरात फिनटेक क्षेत्रात नवीन आणि मोठी पावले पडत होती. त्या कल्पनेने आज केलेली प्रगती आनंद देणारी आहे. गिफ्ट सिटी आज वाणिज्य आणि तंत्रज्ञान केंद्राच्या रुपात आपली भक्कम अशी ओळख निर्माण केली आहे. गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारत आज जागतिक स्तरावर सेवा क्षेत्रात दमदार पाऊल टाकत पुढे जात आहे असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात समाधान व्यक्त केले.

हे ही वाचा:

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडत

महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला घ्यावी लागणार परवानगी

नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; सतर्क राहण्याचा इशारा

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

आर्थिक महासत्ता बनण्याच्या संधी उपलब्ध होतील

गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या मुख्यालयाची पायाभरणी झाली आहे. हे भवन आपल्या वास्तुरचनेच्यादृष्टीने जितके भव्य तितक्याच भारताला आर्थिक महासत्ता बनण्याच्या अपार संधी देखील उपलब्ध करून देईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी मिळेल.

सोन्या चांदीच्या व्यवहारात पारदर्शकता येणार

गांधीनगर मधील इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून प्रत्यक्ष सोन्या चांदीचा व्यवहारात पारदर्शकता व आयातीमध्ये सुलभता येणार आहे. शांघाय गोल्ड एक्सचेंज आणि बोर्सा इस्तंबूल प्रमाणे गांधीनगरात बुलियन एक्सचेंज निर्मितीचे लक्ष्य ठेवून याची वाटचाल राहणार आहे. ज्यामुळे भारताला सराफा व्यापाराचे विशेष प्रादेशिक केंद्र बनवता येणार आहे. जवळपास एक वर्षांपासून सुरू असलेल्या चाचण्या व ड्राय रननंतर हे एक्सचेंज सुरू करण्यात आले.

Exit mobile version